चांदेकसारे लक्ष्मी सोसायटीचे अध्यक्षपदी सौ. लताताई होन बिनविरोध

चांदेकसारे लक्ष्मी सोसायटीचे अध्यक्षपदी सौ. लताताई होन बिनविरोध

As the President of Chandeksare Lakshmi Society, Mrs. Latatai hon unopposed

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 7 Jan.2022 17.50Pm.

 कोपरगाव: तालुक्यातील चांदेकसारे  येथील लक्ष्मी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सौ. लताताई संजय होन व उपाध्यक्षपदी सौ. अनिता शरद होन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून श्री राहणे यांनी काम पाहिले तर त्यांना सचिव विजय खरात यांनी मदत केली.

ही सहकारी संस्था कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत दौलतराव पुंजाजी होन यांनी शेतकरी सभासदांच्या हिता साठी स्थापन केली.संस्थेवर कोल्हे गटाची कंमाड असून कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पाडली.लताताई होन यांच्या नावाची सूचना प्रशांत होन यांनी मांडली तर त्यास मंदाताई होन यांनी अनुमोदन दिले.जिल्हा बँकेच्या स्तरावर संस्थेने दरवर्षी कर्जफेडीवर भर दिल्याने संस्थेचा गौरव झालेला आहे. सभासदांच्या हितासाठी संस्था सदैव तत्पर असते असे संस्थेचे मार्गदर्शक संजय होन यांनी सांगितले.

या निवडीचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,युवा नेते विवेक कोल्हे, माजी सरपंच ॲड. ज्ञानेश्वर होन, माजी उपसरपंच अशोक होन अदीसह सभासदांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page