चांदेकसारे भैरवनाथसोसायटी अध्यक्ष अण्णासाहेब होन तर उपाध्यक्ष सुभाष होन
Chandeksare Bhairavnath Society President Annasaheb Hon and Vice President Subhash Hon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 7 Jan.2022 17.60Pm.
कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ विकास सोसायटीचे अध्यक्षपदी अण्णासाहेब मोहनराव होन तर उपाध्यक्षपदी सुभाष हरीभाऊ होन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबल यांनी काम पाहिले तर त्यांना सचिव विजय खरात यांनी मदत केली.
अध्यक्षपदाची सुचना वाल्मिक होन यांनी मांडली तर उपाध्यक्ष पदाची सूचना विश्वनाथ होन यांनी मांडली.निवडीनंतर संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचा सत्कार संस्थेचे मार्गदर्शक कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच ॲड ज्ञानेश्वर ह़ोन, माजी उपसरपंच विजय होन,वाल्मिक होन, विश्वनाथ होन आदी उपस्थित होते. ही संस्था कोल्हे गटाच्या ताब्यात असून कोल्हे कारखान्याचे संचालक संजय होन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने वेळेत कर्जफेड करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे ,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह सभासद व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





