कोपरगावात रस्त्यांची कामे सुरू नागरिकांत समाधान – आ. आशुतोष काळे

कोपरगावात रस्त्यांची कामे सुरू नागरिकांत समाधान – आ. आशुतोष काळे

Road works started in Kopargaon. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 11Jan.2022 17.20Pm.

कोपरगाव: शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध असतांना देखील शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. मात्र शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे श्री. साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील रस्त्याच्या कामाप्रसंगी केले.

आ.आशुतोष काळे म्हणाले की, शहरातील रस्त्यांच्या झालेल्या वाईट अवस्थेमुळे अगोदरच अडचणीत असलेले व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र रस्त्यांची कामे सुरु झाल्यामुळे शहरातील नागरिक व व्यावसायिकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून दर्जेदार रस्ते करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या.                  

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी,  धरमचंद बागरेचा,  राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहरप्रमुख कलवींदरसिंग डडीयाल,  गटनेते विरेन बोरावके, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, वर्षा गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, कार्तिक सरदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, जावेद शेख, डॉ. तुषार गलांडे, प्रकाश दुशिंग, संतोष टोरपे, चंद्रशेखर म्हस्के, डॉ. राजेंद्र रोकडे, यश हुसळे,  भोसले, पोमण,  भागवत, शेख, जुनेद शेख, जावेद शेख, संतोष गडाख, मुकुंद इंगळे,  काले, श्रीमती कोपरे, श्रीमती आव्हाड, श्रीमती गडाख, नगर अभियंता ओंकार महाडिक, नितीश मिरीकर, दिपक बडगुजर, हर्षवर्धन सुराळकर,  पी.के.गायकवाड आदी उपस्थित होते.             

चौकट :- शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मुहूर्त लागला असून सर्वच ठेकेदारांनी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करावी – अशोक कोठारी (माजी नगराध्यक्ष)                  

Leave a Reply

You cannot copy content of this page