कोपरगाव शहराला आठ दिवसांनी पाणी येते त्याची क्वॉलिटी काय ? -बिपीन कोल्हे
What is the quality of water coming to Kopargaon city after eight days? -Bipin Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 11Jan.2022 17.00Pm.
कोपरगाव : एकेकाळी पाण्यामुळे वैभव पावलेले तालुका पुन्हा एकदा पाण्यापासून वंचित झालेला आहे. गोदावरी नदी आहे.आजूबाजूला इतकी धरण असतानाही आजही शहरासाठी आठ दिवसाआड पाणी येते हा ही दुर्दैवी प्रकार आहे. काय येतं का येत नाही ? याच्याबद्दल मी बोलणार नाही. पाणी कसं येतंय तो ही वेगळा प्रश्न आहे. किती चांगलं पाणी येतं त्या पाण्याची क्वॉलिटी काय असते ? ते पाणी पिण्यास योग्य आहे की ?अयोग्य आहे ? हाही प्रश्न आहे असे रोखठोक विचार संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.त्यामुळे अनेक जण आजारी पडतात. काय होतं हे पत्रकार नेहमी लिहीत असतात त्याला वाच्चता फोडत असतात. असेही ते म्हणाले,
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले गेली अनेक वर्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे पाण्याचा लढा देत आहे कोपरगाव तालुक्याच्या बद्दल बोलत असताना आपण नाशिक विरुद्ध नगर नगर विरुद्ध मराठवाडा असे सातत्याने म्हटले जात आहे. आपण हे विसरतो की शेतकरी ही एकच जात आहे तिला जात धर्म पंथ असे काही नसतं त्याचा फक्त त्याची एकच समस्या असते आणि एकच मागणी असते मला फक्त मुबलक पाणी द्या तेंव्हा नगर नाशिक मराठवाडा हा काही पाण्याचा मुद्दा होऊ शकत नाही.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले, राज्य सरकारची व राज्यकर्त्यांची जर कधी प्रामाणिक इच्छा असेल तर जसा कृष्णा खोरे मधला प्रश्न सोडविला गेला.तसा चाळीस पन्नास वर्षापासून गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्न का सुटला नाही ? नुसतं सातत्याने ती लोक म्हणतात मराठवाडा तहानलेला आहे. नगर तहानलेला आहे.नाशिकचा सुद्धा बराच भाग तहानलेला आहे. मात्र सर्वांची प्रामाणिक इच्छा असेल आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने जर कधी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतील तर हा गोदावरी खोऱ्यातील सर्वात मोठा बेसिन महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे असेल तर गोदावरी खोऱ्याचा बेसन आहे.कारण महाराष्ट्रातील जवळजवळ ३५ ते ४० टक्के लोकसंख्या या गोदावरी बेसिंग मध्ये राहते. आणि तरीही वंचित ठेवला, तर कधी ना कधी याचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
बिपीन कोल्हे म्हणाले, आपण आजचा दिवस जरी हा पत्रकार दिनाचा असला तरी पाण्याच्या प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यासाठी अहोरात्र ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे गेली पन्नास-साठ वर्षे सातत्याने लढा देत आहे संपूर्ण आयुष्य त्यांनी पाण्याच्या लढ्यासाठी दिले अनेक लढे दिले हा प्रश्न उपस्थित झाला निश्चितच आपण यावर सुद्धा प्रमुख्यांने आपली भूमिका पश्चिमेचे पाणी जेथे समुद्राला जाते त्याचा काही उपयोग होत नाही ते पश्चिमेचे पाणी तुम्हा-आम्हा सर्वांना एकत्र येऊन पूर्वेकडे कसे वळवता येईल १०० ते ११० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यातील पाण्याची जी तूट आहे. ही आपल्याला कशी भरून काढता येईल यासाठी एकत्र येऊन आपल्याला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तरच बाकीच्या सर्वांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. आपण म्हणतो हा शेतकरी प्रधान देश आहे मग त्याच्यासाठी जर आपण थोडसं योगदान दिलं तुमच्या सर्व पत्रकारांनी आजपर्यंत असे योगदान दिलेले आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.