स्वयंचलित हवामान केंद्रासाठी कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावे – आ. आशुतोष काळे
Department of Agriculture should immediately send proposal for automatic weather station – Mla Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 11Jan.2022 17.40Pm.
कोपरगाव : राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींना कृषी विभागाकडून स्वयंचलीत हवामान केंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावे अशा सूचना श्री साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभाग आढावा बैठकित दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, सभापती सौ. पौर्णिमा जगधने, सौ. सोनाली रोहमारे, व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, मधुकर टेके, श्रावण आसणे, कारभारी आगवन, गोरक्षनाथ जामदार, विजय जाधव, विठठल जावळे, दिलीप शिंदे, जयंतराव रोहमारे, दिलीप गोरे, संदीप शिंदे, चांगदेव घुगे, नारायण वलटे, आबासाहेब शिंदे, विजय शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पंचायत समितीचे पंडित वाघिरे, तालुका प्रभारी कृषि अधिकारी मनोज सोनवणे मंडळ कृषी अधिकारी चांगदेव जवने, अविनाश चंदन, सुनिल गावित, आत्माचे शैलेश आहेर तसेच शेतकरी उपस्थित होते.
आ. आशुतोष काळे म्हणाले की, नुकसान भरपाई तसेच पीक विमा नुकसान भरपाई पासून कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. शेततळ्याचे अनुदान वर्ग झाले असल्याचे सांगत जास्तीत जास्त योजना ह्या शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचवा त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा कोणत्याही परिस्थितीत शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी कृषी विभागास दिल्या.
यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिनिधी स्वरूपात शेततळ्याचे अनुदान, नुकसान भरपाई, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे प्रमाणपत्र अशोक राशिनकर, रेखा जाधव, भाऊसाहेब शिंदे यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले.
चौकट :
कोपरगाव तालुक्यात स्वयंचलीत हवामान केंद्र वाढवावी अशी राज्यातून सर्वप्रथम मागणी केली होती. त्याबाबत सातत्याने कृषी मंत्री ना. दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. हा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी मार्गी लावला त्याबद्दल त्यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार-.विजय जाधव





