कोपरगांव गॅस कंपनीतर्फे गोविंद नगर भागात गॅस सुरक्षा मेळावा संपन्न.
Kopargaon Gas Company conducts gas safety fair in Govind Nagar area.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 11Jan.2022 17.50Pm.
कोपरगाव : परिसरातील गॅस धारक महिलांना गॅस उपकरणे सुरक्षितपणे हाताळणे कामी प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करण्यात आले,
बहुतांशी गॅस अपघात हे गॅस वापरताना होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांमुळे होतात उदाहरणार्थ,गॅस शेगडी सिलेंडरपेक्षा उंच पातळीवर नसणे,गॅस पाईप हलक्या प्रतीचा अथवा मुदतबाह्य असणे,गॅस शेगडी नियमित दुरुस्ती अथवा सर्व्हिसिंग न करणे,गॅस सिलेंडर आडवे किंवा उलटे करून वापरणे इ. अशा छोट्या छोट्या चुकांमुळे नेहमी गॅस अपघात घडत असतात.ते टाळण्यासाठी कोपरगावला गोविंदनगरमध्ये कोपरगाव एचपी गॕस कंपनीच्या वतीने नुकताच मेळावा संपन्न झाला.
गॅस शेगडी नेहमी सिलेंडरपेक्षा उंच पातळीवर असावी.गॅस पाईप हा सुरक्षा पाईपच असावा व तो मुदतीत बदललेला असावा गॅस शेगडी नियमितपणे कंपनीच्या अधिकृत मकेनिककडून सर्व्हिसिंग करून घ्यावी.गॅस सिलेंडर नेहमी उभ्या व सरळ अवस्थेत असावे.गॅस सिलेंडर वापरत नसताना सेप्टि कॅप लावून ठेवावी.स्वयंपाक झाल्यानंतर अथवा रात्री रेगुलेटर चे बटन बंद ठेवावे. सदर मेळाव्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पो. लि. तसेच केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व गॅस योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली,
गॅस गळती झाल्यास घाबरून न जाता सिलेंडर पासून रेग्युलेटर वेगळे करून सिलेंडरच्या व्हॉल्वला सेप्टि कॅप लावून सिलेंडर मोकळ्या हवेला ठेवावा आणि कोपरगांव गॅस कंपनीच्या 9325992525–9511778777 या आपत्कालीन संपर्क क्रमांक अथवा हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पो. लि. ने विकसित केलेला 1906 या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क करावा.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडणेकामी व्यवस्थापक लक्ष्मण निमसे, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,अंगणवाडी सेविका कोपरगांव गॅस कंपनीचे सर्व मॅकेनिक आदींनी विशेष परिश्रम घेतले.