ढगाळ वातावरण पारा घसरल्याने कोपरगावकर गारठले! हुडहुडी वाढली, तापमान ९ अंशांवर
Kopargaonkar froze due to cloudy weather The temperature rose to 9 degrees
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 18.50Pm.
कोपरगाव: थंडी गारठा चांगलाच वाढला असून जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्रावर तापमापक पारा ९ अंश सेल्सिअस वर गेला आहे अशी माहिती प्रभारी हवामान निरीक्षक चेतन पऱ्हे यांनी दिली.
उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम तालुक्यातील वातावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवकाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. आठवडाभरात शहरातील कमाल तापमानात जवळपास २ अंशांची घट झाली असून, गुरूवारी (दि.१३) किमान तापमान १० तर कमाल तापमान २३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हिमाचल प्रदेशच्या लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील तापमानाचा पारा शून्यावर पोहोचला आहे
. त्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या तापमानात देखील घट झाली आहे. या लाटेमुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधील तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दिवसरात्र वाहणार्या गार वार्यांनी हुडहुडी भरली आहे. स्वेटर, कानटोेपीशिवाय फिरणे अशक्य झाले आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे बाजारपेठाही ओस पडलेल्या दिसून येत आहे. रात्री आठनंतर वर्दळ असलेला गोदाकाठ गेल्या दोन दिवसांपासून निर्मनुष्य दिसून येत आहे.बोचऱ्या थंडीने हैराण उबदार कपड्यांची खरेदीसाठी मेनरोड परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान निफाडमध्ये ५ ते ८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या थंडीचा रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच फळबागांना लाभ होत आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.
थंडीचा जोर संक्रांतीपर्यंत असाच राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खारीक, खोबरे, सुका मेवा यांना मागणी अजुन पंधरा दिवस कायम राहणार आहे.