कोपरगावात योग आरोग्य शिबीर  संपन्न

कोपरगावात योग आरोग्य शिबीर  संपन्न

Yoga health camp held in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 18.40Pm.

 कोपरगांव: सध्याच्या धकाधकिच्या जीवनात अनेकांच्या आरोग्याकडे व माणसिक स्वास्थाकडे दुर्लक्ष होताना जाणवत आहे. प्रत्येकाचे सुंदर तन आणि शांत  मन ठेवण्याकडे प्रयत्न असतो, परंतु तसे होताना दिसत नाही. अनेकदा मार्गदर्शनाचा  अभाव जाणवतो. मार्गदर्शनाची  गरज ओळखुन रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रल आणि आर्ट ऑफ  लिव्हिंगच्या वतीने कृष्णाई  मंगल कार्यालयात नुकतेच तीन दिवसीय योगा व नाडीपरीक्षण शिबीर  कोविड १९  ची मार्गदर्शक  तत्वे पाळून संपन्न झाले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे जळगांव येथिल योगाचार्य माधवराव गवळी यांनी योग प्रशिक्षणाचे  उत्तम प्रशिक्षण  दिले. यात प्रामुख्याने योग साधना कशी  करावी, श्वासोच्छवासाची लय कशी  असावी, ध्यान धारणा कसे करावे, इत्यादी बाबी शिकविण्यात आल्या. तसेच वेगवेगळया व्याधींसाठी कोणकोणती योगासने उपयुक्त असतात, याची माहिती देण्यात आली.

डाॅ. अनिशा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  मानवी शरीराच्या विविध प्रकृती, व्याधी व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी नाडीपरीक्षण करण्यात आले. या शिबिरा दरम्यान योगाचार्य उत्तमचंद शहा, राष्ट्रीय  स्तरावर येाग स्पर्धेत रौप्य पदक विजेते प्रज्वल आदिनाथ ढाकणे आणि राज्यस्तरीय योग स्पर्धा विजेती वैष्णवी  आदिनाथ ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबिरार्थींना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योग प्रात्यक्षिके दाखविली.  

 शिबीर  यशस्वी करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, बांधकाम व्यावसायिक संग्राम देशमुख, आर्ट ऑफ  लिव्हिंगचे संजय ठोळे, संजय थोरात, डाॅ. अंकित कृष्णानी , राणी रोडे, रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रलचे प्रेसिडेंट रोहित वाघ, सचिव विरेश  अग्रवाल, राकेश  काले, प्रकाश  जाधव, अमर नरोडे, विशाल  आढाव, शशिकांत  होन, कपिल पवार यांनी प्रयत्न केले. उद्घाटन व सांगता  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. अंकित कृष्णानी  यांनी केले तर रोटरी क्लब समन्वयक डाॅ. विनोद मालकर यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page