समता स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी खुली स्कॉलरशिप परिक्षा; १ लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती

समता स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी खुली स्कॉलरशिप परिक्षा; १ लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती

Open Scholarship Examination for Students in Samata School; Scholarship up to Rs. 1 lakh

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 19.20Pm.

कोपरगाव: समता इंटरनॅशनल स्कूलमधील विज्ञान शाखेतील इयत्ता ११ वी च्या विद्यार्थांची गुणवत्ता कौशल्ये वाढावी  तसेच पुढील काळात येणाऱ्या परीक्षांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचा उपयोग व्हावा यासाठी १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येणार आहे. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विज्ञान, गणित या विषयातील ज्ञानाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी आकारली जाणार नाही. कोपरगाव शहरातील इतर शाळेचे विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात. या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थांसाठी आकर्षक बक्षिसे व संस्थेकडून स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी समता इंटरनॅशनल  स्कूलच्या शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांचेशी ७२७६१५७६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.    

शहरातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात. शहरातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण असते, पण ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचे शिक्षण मिळत नाही. या वर्षीही समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे.  मागील चार वर्षापासून समता स्कूलने ११ वी व १२वी वाणिज्य, विज्ञान शाखा सुरु केल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याबरोबरच शहरातील विद्यार्थीही समता स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा करत असतात.  समता इंटरनॅशनल स्कूलच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा दर्जा लक्षात घेता एका वर्गामध्ये ४५ विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे तसेच प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिकीकरण आणि खासगीकरणामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत आहे वेगवेगळे कोर्स अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले जात आहे. समता इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी JEE / NEET २०२१ या  शैक्षणिक वर्षामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

समता स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदयार्थांना अध्यापन करण्यासाठी उच्चशिक्षित तज्ञ प्राध्यापक स्टाफ, वसतिगृहाची व्यवस्था, विद्यार्थ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांचे शंका निरसन, शास्त्रीय पध्दतीने केलेले गुणवत्ता विश्लेषण, गट चर्चा,व्यक्तिगत गुणवत्ता धोरण, ऑनलाईन परीक्षा तसेच अतिशय  निसर्गरम्य, प्रदूषण विरहीत, सुबक बांधकामयुक्त इमारतीमध्ये हा अभ्यासक्रम घेतला जातो. या सर्व गोष्टींचा फायदा विद्यार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी होत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page