संक्रांतीच्या बाजारात आडदांड वळूचा धुडगूस-सर्वत्र घबराट
In the Sankranti market, there is a commotion of bulls everywhere
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 13Jan.2022 19.30Pm.
कोपरगाव: शहरातील गोदाम गल्ली परीसरात आज आडदांड वळूने पळापळ करून अनेकांच्या अंगावर चाल करून जात तसेच वाटसरूंना व दुचाकी चालकांन च्या मागे पळून धडकी भरायला लावली. काही काळ तो वळू गायींच्या मागेही लागला ,गाईंना या वळूने पळायला लावले धडक होता होता राहिली.
मकर संक्रांतीनिमित्त आज बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी असल्याने नागरिक महिला घबराटीचे वातावरण पसरले. सध्या शहरात वर्षानुवर्ष मोकाट जनावरे गल्लोगल्ली फिरत असतात पालिका जुजबी कारवाई करते.
नगरपालीकेने मोकाट जनावरे पकडावी आणि जनावरांच्या मालकांना भरघोस दंड आकारला जावा अशी जनतेची आशा अपेक्षा आहे. मोकाट जनावरां पाई गेल्या काही वर्षांपूर्वी एक विद्यार्थी व बेट भागातील एका जेष्ठ नागरिकाचा बळी गेला आहे .म्हणून नगरपालीकेने त्वरित मोकाट जनावरे पकडावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी आता प्रशासककडे करण्यात आली आहे .माणसाचा हकनाक बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.