कोपरगावात पतंगोत्सवाचा धुमधडाका!

कोपरगावात पतंगोत्सवाचा धुमधडाका!

Kite festival in Kopargaon Dhumdhadaka

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 14Jan.2022 16.50Pm. मकर संक्रात हार्दीक शुभेच्छा !

कोपरगाव :घराघरांवर गच्चीवर बाळ गोपाळ तरुण-तरुणींची पतंग उडवण्यासाठी झालेली गर्दी ….. सोबतीला टेप रेकॉर्डर चा दणदणाट…. धमाल गाणी मस्ती…. खाण्यासाठी भेळ भत्ता समोसे भजे वडे…. आदींची रेलचेल अशा मस्त बेधूंद वातावरणात दिवसभर रंगलेली पतंग काटाकाटीची स्पर्धा, हे चित्र यंदाही पतंगवेडे शहर समजल्या जाणार्‍या कोपरगाव शहरात मकरसंक्रांतीच्या दिवशी दिसून आले.

तरुणाईसह अबालवृद्धांचा सहभाग दिवसभर आकाशात रंगीबेरंगी पतंगांनी शहर पतंगमय झाले होते… मुंबई सह राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेत नवीन रुग्णांची संख्या अधिक, मात्र… सर्व काही विसरून मकर संक्रांति उत्सव आनंदात साजरा झाला.

कुठे येवल्याच्या प्रसिद्ध ‘हलकडी’चा कडकडाट, तर कुठे जुन्या-नव्या हिंदी मराठी, कुठे ‘रिमिक्स’ उत्साहवर्धक गाण्यांच्या तालावर थिरकणारी पावले…ओसांडून वाहणारा जोश अन् जल्लोषात केवळ पतंगोत्सव व त्यातील पतंगांची धूम… आकाशात घिरट्या घालणारे रंगीबेरंगी पतंग अन् या सर्व परिक्रमेत अगदी दिवसभर रंगलेली पतंग काटाकाटीची स्पर्धा, हे चित्र यंदाही पतंगवेडे कोपरगाव शहर समजल्या जाणाऱ्या  (दि.१४) मकरसंक्रांतीच्या दिवशी दिसून आले.

गुजरातमधील अहमदाबादनंतर देशात दुसरा क्रमांक, तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक अशी ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या कोपरगाव व येवला शहरातील पतंगोत्सवाला यंदाही शानदार सुरुवात झाली. अवघं कोपरगाव व येवला शहर पतंगमय झालेलं आहे. पतंग उत्सवाचा  शानदार श्रीगणेशा झाला. भोगीच्या या पहिल्या दिवशी शहरातील पतंगप्रेमी विशेषतः बच्चे कंपनीसह तरुणाईने हाती आसारी घेत पतंगाला ढिल दिली होती.

यंदाही येथील पतंगप्रेमींकडून प्रसिद्ध पतंग उत्सवाची मोठी धूम सुरू आहे. परिसर दुमदुमून टाकणारा व प्रत्येक घरादारांच्या धाबे अन् गच्चींवरून निघणारा आवाज, अगदी तहानभूक विसरत केवळ पतंग म्हणजे पतंगातच दंग होणारे तरुणाईसह अबालवृद्ध ही पतंगोत्सवाची मोठी खासियत आहे.  मकरसंक्रांतीच्या दिवशी येथील पतंग उत्सवातील उत्साह अधिकच दिसत होता. शहरातील सर्वच व्यवहार व्यापारीवर्गाकडून स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले जाताना रस्त्या रस्त्यावर शुकशुकाट अन् घरादारांच्या गच्ची व धाब्यांवर पतंगवेडे कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण जल्लोष दिसून आला.                                           

 अगदी सकाळीच गच्चीवर चढलेला कोपरगावकर सायंकाळी सूर्य मावळतीला गेल्यानंतरही खाली उतरला नव्हता. अनेक घरांच्या गच्ची व धाब्यावरच अनेकांनी नाश्ता, दुपारचे जेवण घेतल्याचे दिसून आले. पतंग काटल्यावर ओरडनारी तरुणाईत ओय कॉप्या … धील दे रे… बेधुंद नाचणे चित्र आज सर्वत्र दिसून आले. काढलेली पतंग रस्त्यावर धरणाऱ्या मुलांची टोळी मोठ्या प्रमाणावर कार्यरत होती पोलिस बंदोबस्त चोख होता.पोलिसांनी तीन चायना नायलॉनमांजा च्या विरोधात गुन्हे दाखल केले असले तरी सर्रास नायलॉन मांजाचा वापर झाला असल्याचे दिसून आले.                 

   चौकट                                           

गेल्या तीन वर्षापासून गॅसच्या फुग्यावर  बंदी आहे. रंगीबेरंगी फुगे लहान मुलांचे आकर्षण ठरले, त्यामुळे साधे हवेचे फुगे मोठ्या प्रमाणावर विकले गेले हे रंगीबिरंगी फुगे घेण्यासाठी तीन बत्ती चौकात पारंपारिक व्यवसाय करणारे सुनील कोसंदल यांच्याकडे मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page