कोपरगावात नायलॉन मांजा विक्री प्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल

कोपरगावात नायलॉन मांजा विक्री प्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल

Three persons have been booked for selling nylon Manja in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 14Jan.2022 16.40Pm. मकर संक्रात हार्दीक शुभेच्छा !

कोपरगाव : नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरात  दोन ठिकाणी तर तालुक्यात रवंदे येथे एका ठिकाणी शहर व ग्रामीण पोलिसांनी धाडी टाकून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुख्य रस्त्यावर असलेल्या पतंग असारी विकणाऱ्या तुळशीदास शिवलिंग पवार (६२) . त्याच्याकडे नायलॉन मांजाची चार रिळ प्रत्येकी पाचशे रुपये किंमत एकूण किंमत दोन हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे तर अजहर अबूबकर मनियार (२७) राहणार जिजामाता उद्यान जवळ यांचेकडे आठ हजार २५० रुपये किमतीचा नायलॉन मांजा विकताना मिळून आला तर तालुक्यातील रवंदे येथे शिव कृपा किराणा या दुकानात विठ्ठल लहू कंक्राळे (५५) यांचे कडे सव्वीसशे दहा रुपये किमतीचा नायलॉन मांजा निंजा मोना काईट कटर १६ बंडल मिळून आले या ठिकाणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विलास मासाळ यांनी तसेच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली .                                   

   तुलसीदास पवार यांचे विरोधात शहर पोलिस ठाण्यात भा द वि १८८,३३६पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे क्रमांक ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहे. सदर कारवाईमुळे पतंग विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून याबाबत शहरात कुठे कुठे नायलॉन मांजा विक्री होत आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page