पोहेगावात छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शासकीय मान्यता- नितीन औताडे

पोहेगावात छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शासकीय मान्यता- नितीन औताडे

Is in Pohegaon. Government approves equestrian statue of Shivaji Maharaj – Nitin Autade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 15 Jan.2022 17.00Pm. 

कोपरगाव : छ. शिवाजी महाराजांचे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन लवकरच लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती राजे छ. शिवाजी महाराज स्मारक समितीचे मार्गदर्शक शिवसेनेचे नितीन औताडे यांनी दिली.

नितीन औताडे पुढे म्हणाले, छ. शिवाजी महाराज स्मारक समिती, पोहेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून सर्व शासकीय बाबींची पूर्तता जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गठीत समितीने पोहेगाव येथे छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला शासकीय मान्यता दिली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणनंतर पोहेगांवच्या विकासात भर पडणार आहे.

खासदार सदाशिवराव लोखंडे व नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मारकाच्या कामासाठी शासकीय बाबींची पूर्तता करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले त्यांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळेच सर्व विभागाच्या तांत्रिक मान्यता ग्रामपंचायतीने घेऊन शासकीय मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर १२ जानेवारी रोजी पोहेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनिशी छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यता मिळाल्याचे पत्र मिळाले. पोहेगाव ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागांमध्ये छ. शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लकी ड्रॉ व ग्रामस्थांच्या आर्थिक साह्यातुन ३५ लाख रुपये खर्चून हे स्मारक उभे राहत आहे. पुणे कात्रज येथील परदेशी आर्ट्स करून पंचधातुचा छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा निर्माण करण्यात आला आहे. चौथरा बांधकाम पूर्ण झाले असून संरक्षण भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या अवतीभोवती विशिष्ट प्रकारचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सरपंच अमोल औताडे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून या स्मारकाला मान्यता मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न चालू होते.अखेर १२ जानेवारी रोजी मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पोहेगावच्या तरुणांनी आनंद व्यक्त केला. याकरीता खासदार सदाशिवराव लोखंडे , नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे ग्रामस्थ व राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने नितीन औताडे यांनी आभार मानले आहे…

Leave a Reply

You cannot copy content of this page