कोपरगाव तालुक्यात हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी
Crop destruction by deer herd in Kopargaon taluka
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 15Jan.2022 17.10Pm.
कोपरगाव: गेल्या महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना संवत्सर,कान्हेगाव, खोपडी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे.दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप संवत्सर परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतक-यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाण्याची साठवण करून गहू, हरभरा, कांदा पिके जगविण्यासाठी धडपड असाताना दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून हरणांचा संवत्सर भीमवाडी परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतक-यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव, संवत्सर,खोपडी भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक हरण व काळवीटचे कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. हे हरणांचे कळपदेखील अन्न आणि पाण्याच्या शोधात संवत्सर परिसरात आले असल्याची चर्चा आहे. शेतातील हरभरा,कोवळे उसाचे कोंब , कांदे , मका खाण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हिरवा घास हरिण खाऊन जात असल्याने घरच्या जनावरांच्या चा-याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी चिंतित आहे. वनविभागाने हरणांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करणे गरजेचे असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे.