कोपरगांव भाजपाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निषेध 

कोपरगांव भाजपाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निषेध

Congress state president Nana Patole’s protest on behalf of Kopargaon BJP

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 18Jan.2022 15.30Pm.

कोपरगांव :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सेवक असुन ते निस्वार्थपणे अहोरात्र काम करतात त्यांच्याविषयीचे अनुदगार भारतीय जनता पक्ष कधीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजवर विविध पदावर जबाबदारीने काम केले असुन त्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही त्यांचा धिक्कार करून तीव्र शब्दात निषेध नोंदवित असल्याचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यानी दिली.

कोपरगाव तहसील कार्यालयाचे चंद्रशेखर कुलथे यांनी या निवेदनाचा स्विकार केला. प्रारंभी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले प्रास्ताविक करताना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वडयाचे तेल वांग्यावर काढुन हकनाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुदगार काढले ते निषेधार्ह असुन त्यांनी जनतेची तात्काळ माफी मागावी अन्यथा काळ्या फिती लावून त्याचा निषेध करू.असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, बाळासाहेब पानगव्हाणे, सरचिटणीस दिपक चौधरी, अर्जुन माकोणे, कैलास घट, प्रकाश शेळके. शेतकरी आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानोडे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीकभाई कुरेशी, आदि पदाधिकारी उपस्थित होते.           

साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, देशाच्या सांस्कृतीक विचारधारेला काँग्रेस पक्ष आणि त्याचे राज्याचे नेतृत्व रसातळाला नेउन ठेवण्याचे पाप करत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवंग लोकप्रियतेसाठी आचरट वक्तव्ये करण्याची सवय आहे. शेवटी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page