कोपरगाव शहरातील रस्त्याच्या निकृष्ट कामाचा आत्मक्लेष सत्याग्रहाव्दारे निषेध- संजय काळे
Satyagraha protest against inferior road work in Kopargaon city – Sanjay Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 17Jan.2022 15.40Pm.
कोपरगाव शहरातील रस्त्याच्या निकृष्ट कामाचा आत्मक्लेष सत्याग्रहाव्दारे निषेध- संजय काळे कोपरगाव शहरामध्ये ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गांधी चौक येथील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी आत्मक्लेश सत्याग्रह करून निषेध नोंदवला आहे.
याबाबत बोलताना संजय काळे म्हणाले सन २००५ पासून कोपरगाव शहरातील भ्रष्ट कारभाराविरुद्ध मी आवाज उठवीत आहेगेल्या वीस वर्षात कोपरगाव नगरपालिकेची ही चौथी नगरपालिका निवडणूक आहे निवडणूक आली की शहरात रस्ते विकासाची कामे सुरू होतात निवडणूक संपली की रस्त्यावरील डांबराचा मुलामा उडून जातो. रस्ते पर्ववत होतात.खड्डे व धुळ कोपरगाच्या जनतेच्या पाचवीलाच पुजलेले प्रत्येक कामाच्या वेळेसच काम गुणवत्तेत नसल्याबाबत तक्रारी केल्या. पूर्व व पश्चिमेच्या सहमती एक्सप्रेस मधील महाभाग मला वारंवार सल्ला देतात.. कामे होऊ द्या, विकास होऊ द्या, मग बोंबलत बसा. मी कोपरगावचा एक इमानदार श्वान निकृष्ट म्हणून कायम ओरडतो. पण स्वतःला जनतेचे सेवक व रक्षक म्हणविणारे आजी ना माजी ना होऊ घातलेले नगरसेवक, नगराध्यक्ष, ना आमदार, ना खासदार गेल्या वीस वर्षात निकृष्ट कामाचे संदर्भात ओरडले नाही, लोक प्रतिनिधी लोक सेवकांचे सोडा पडत जनतेतून आजवर कोणी आवाज उठले नाही याचे वाईट वाटते अशी खंत संजय काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
संजय काळे म्हणाले, एक रस्ता किमान वर्षासाठी तरी खड्डा मुक्त नाही. गावातील धुळ कधीच कमी झाली नाही. बाजारात ग्राहक नाही.कोपरगावची बाजारपेठ येवला वैजापूर राहाता संगमनेरला गेली. रॉकेल गाडीतला नगरसेवक डस्टर घेऊन फिरू लागला. नगरसेवकच पातीत ठेकेदार झालेत आणि नगरसेवकांची तिसरी पिढी आता नगरपालिका सांभाळायला सज्ज झाली.तिसऱ्या पिढीचे आमदार घराणे किमान रस्त्यांची गुणवत्ता देण्यास असमर्थ ठरलेत, आज कोपरगावात जवळजवळ सगळ्याच रस्त्यांची कामे चालू आहेत. चालू असलेल्या एकाही रस्त्याला गुणवत्ता नाही. तक्रारी केल्या पण दखल कुणी घेत अधिकारी ठेकेदार व तथाथित नेते यांचे साटेलोटे स्पष्ट दिसते. तक्रारी करा आम्हाला थोडी वाटप जास्त करावी लागेल हा मग्रूरीचा सूर.वरिष्ठ फक्त कागदी घोडे नाचवतात. जनतेचे भोग. तरीही जनता गप्पच, दैत्य गूरूंची भूमी, आज मला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वाक्य आठवले.सच परेशान हो सकता है पराजीत नही, पण कोपरगाव नगरपरिषदेच्या निर्लज्जपणाचा कळस आहे.त्यामुळे आत्मक्लेषाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी चार तास उन्हात बसून राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेष सत्याग्रह करून शासन नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार यांचा निषेध व्यक्त करीत आहे. असे काळे यांनी सांगितले.
चौकट
कामे गुणवत्तेत करा हिच मागणी.. ह्या सर्व कामांच्या गुणवत्तेची तपासणी पुणे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांचे कडून करावी. काँक्रीट रस्त्यावर केलेल्या डांबरीकरणाला राष्ट्रीय पारितोषीक मानांकनासाठी मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांचे नामांकन जाहीर व्हावे हे आवाहन संजय भास्करराव काळे





