सोमय्या कॉलेजच्या मुलींनी राष्ट्रीय बेसबॉल रौप्यपदकांवर नाव कोरले-प्रा.डॉ.यादव
Somaiya College Girls Wins National Baseball Silver Medal – Prof. Dr. Yadav
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 18Jan.2022 16.50Pm.
कोपरगाव:”ग्लोबल युनिव्हर्सिटी, गुवाहाटी येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय बेसबॉल (मुली) स्पर्धेत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने रौप्य पदक प्राप्त केले असून या संघात स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. दीक्षा नवले व कु. सादिया तांबोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसेच पदकावर नाव कोरण्यासाठी संघामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे, ” अशी माहिती प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी येथे दिली.
डॉ. यादव पुढे म्हणाले की “या दोन्ही खेळाडू विद्यार्थिनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये शिकत असून त्यांनी अभ्यासाबरोबरच बेसबॉल या मुलींच्या खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील इतर विद्यार्थिनींसमोर आपल्या या नेत्रदीपक कामगिरीतून एक आदर्श ठेवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी देखील खेळांमध्ये मागे नाहीत, हेच या दोन्ही विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे.”
दीक्षा नवले व सादिया तांबोळी यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड संजीव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे व अन्य प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने विशेष अभिनंदन केले आहे.