चमत्कार.! रस्त्याचे काम पुढे चालू मागे खड्डे; अस्तरीकरण ऊसवले – कैलास जाधव
Miracle.! Pits behind the road work going on; Lining Usavale – Kailas Jadhav
नगरपालिकेचे या कामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष!Meaningful neglect of this work of the municipality!
नागरिकांच्या तक्रारी वाढल्या, नगरपालिका प्रशासन सुस्त. Complaints of citizens increased, municipal administration sluggish.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 18Jan.2022 15.40Pm.
कोपरगाव नगरपालिका हद्दीतील शहरातील जवाहर मेडिकल ते एस. जी. विद्यालय रस्ता, साई तपोभूमी ते अण्णाभाऊ साठे पुतळा या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम नगर पालिका निधीतून सुरु आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे रस्त्याचे कारपेट करण्यात आले आहे मात्र त्यावरील खडी व डांबर वेगळे झाले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडला गेला आहे.

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे या रस्त्याचे निकृष्ट काम सुरू आहे सील कोट करण्याचे बाकी आहे मात्र त्यापूर्वीच खडी बाजूला होऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मंगळवारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सेना नगरसेवक कैलास जाधव यांनी पालिकेत जाऊन बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पालिका बांधकाम विभागाकडे सक्षम अधिकारीच नाही.
कैलास जाधव म्हणाले, कोपरगाव शहरातील महत्त्वाच्या विविध रस्त्याचे डांबरीकरण नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर महिनाभरापूर्वी भूमिपूजन करण्यात आले या सर्व रस्त्यांसाठी साधारणता आठ दहा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पाच वर्ष दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून नागरिकांचे कंबरडे मोडले नंतर जनतेचा कळवळा आल्याच्या थाटात मोठा गाजावाजा करून ठेकेदारामार्फत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. वीस दिवसापूर्वी रस्त्यावर खडीकरण करण्यात आले त्यानंतर आठ दहा दिवसांपूर्वीच या रस्त्यावर खडी व डांबराचे अस्तरीकरण करण्यात आले मात्र काम पूर्ण होताच हा रस्ता जागोजागी खराब झाला आहे त्यावर संबंधित अधिकारी म्हणतात की रस्त्याला सील कोट करण्याचे काम बाकी आहे मात्र झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाणार का ? मात्र असे असताना पालिके चे अधिकारी काम सुरू असताना कोठे होते ? नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर अधिकारी जागे होत नाही याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

तसेच पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही कामे सुरू झाली आहेत निवडणुका कधीही लागू शकत असल्याने म्हणूनच ठेकेदारांनी घाई घाई मध्ये अशाप्रकारे काम केले आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
विशेष म्हणजे आम्ही रस्त्याची पाहणी करत असताना ठेकेदाराची माणसे टेप लावून झालेल्या कामाचे मोजमाप करीत होते अशी माहिती जाधव यांनी दिली.
संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम करण्यास घाई केली. त्यासाठी वापरण्यात आलेले डांबर व खडी निकृष्ट दर्जाची होते त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत ठेकेदारांच्या या गलथान कारभारामुळे हा रस्ता तयार होताच खराब झाला आहे या गलथानपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला असल्याचे मत यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी व्यक्त केले आहे. नगरपालिकेच्या निधीतून हा रस्ता होत असल्याने नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष असणे जरुरीचे होते मात्र अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे निष्कृष्ट काम झाले आहे का? रस्त्याच्या कामात डांबर कमी वापरल्यामुळे खडी डांबर मिक्स झाले नाही त्यामुळे रस्ता खराब झाला आहे यासंदर्भात ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
कोट
खडी डांबर अस्तरीकरण करण्यापूर्वी रस्ता साफ करून घ्यावा लागतो व त्यानंतर त्याच्यावर काम केले जाते मात्र तसे झाले नाही माती वरच डांबरीकरण करण्यात आल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून नगरपालिकेने आम्हाला त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचे लेखी पत्र द्यावे अन्यथा आपण शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करणार आहे कैलास जाधव (सेना नगरसेवक) शिवसेना उपजिल्हाप्रमुख
चौकट
५ वर्षानंतर या रस्त्यांना मंजुरी मिळाली मात्र ठेकेदाराच्या गलथानपणामुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित झाली आहे गुणवत्तापूर्ण रस्ते व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आत्मक्लेश सत्याग्रह केला आहे





