कोल्हे साखर कारखान्याची स्मार्ट वाटचाल -विवेक कोल्हे
The smart way of the Kohle sugar factory – Vivek Kohle
मोबाईल ॲप द्वारे केन हार्वेस्टींग व ऑटो व्हेईकल नंबर टॅग रिडर प्रणाली : आधुनिकतेकडे आणखी एक पाऊल Ken Harvesting and Auto Vehicle Number Tag Reader System via Mobile App: Another Step Towards Modernity
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 15.00Pm.
कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सभासद हिताला प्राधान्य देणारा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा कारखाना म्हणून लवकरच महाराष्ट्रात ओळखला जाईल आहे. चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असून मोबाईल ॲपद्वारे केन हार्वेस्टींग व ऑटो व्हेईकल नंबर टॅग रिडर प्रणालीव्दारे आधुनिकतेकडे आणखी एक पाऊल असल्याचे गौरवोद्गार कारखान्याचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी गुरुवारी (२०) रोजी प्रणालीच्या शुभारंभी व्यक्त केले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले, आता मोबाईल ॲपद्वारे केन हार्वेस्टींग व ऑटो व्हेईकल नंबर टॅग रिडर सिस्टीम प्रणालीचा अवलंब ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी करत कोल्हे कारखान्याने आधुनिकतेकडे आणखी एक पाऊल टाकले आहे.त्यामुळे ऊस गाडी नंबर लावण्यात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. त्याच बरोबर आता ऑटोमॅटिक नंबर टेकिंग प्रणालीचा अवलंब आज पासून कारखाना करत असून यामुळे वेळेची बचत होणार आहे.ऊस नोंदणीसाठी महिंद्र अँड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने देशात सर्वप्रथम कोल्हे कारखान्याने उपग्रहाद्वारे उस क्षेत्र सर्वेक्षण सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर लवकरात लवकर गाळप व्हावे, या दृष्टिकोनातून कोल्हे कारखान्याने ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच स्मार्ट कार्ड दिले आहेत.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले, लवकरच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना जी.पी.एस प्रणालीचा वापरही करण्यात येणार आहे.ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे प्रत्येक उसाच्या प्लॉटपासुन ते कारखाना साईट पर्यंतचे अचुक अंतर समजते. वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अचूक लोकेशन, इंधनाची स्थिती व वाहन चालू कि बंद आहे हे समजते. आपल्याकडे वाहतुकीचा करार केलेला वाहतूकदार जर बाहेरील कारखान्यास उस वाहतूक करत असेल तर लगेच समजते. ऊस भरून आलेले वाहन आपल्या कारखान्याच्या वाहन तळामध्ये आल्यास त्याचा ऑटो नंबर लागतो. आपला नंबर किती लागला आहे हे वाहन मालकास लगेच घरबसल्या समजते. ज्यामुळे तोडणी यंत्रणा गतिमान होणार असून ज्याचा फायदा साखर उतारा वाढल्याने शेतकऱ्यांना व कारखान्यास निश्चितपणे होणार आहे.”
विवेक कोल्हे पुढे म्हणाले, कोल्हे कारखान्याने नेहमी संघर्षातुन स्वत:ला सिद्ध केले आहे. शेतकर्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषि योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, ऊस बेणे, यासारखे उपक्रम कारखाना सातत्याने राबवित आहे. कारखान्याचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शेतकरी सभासदांना आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. सभासदांना त्वरित साखर, टनेज व बिलांची माहिती स्मार्ट कार्डमुळे मिळत आहे. ऊस नोंदीही कोल्हे कारखान्यात मोबाईल अँपद्वारे घेतल्या जात आहेत. ज्यामुळे शेतकरी सभासदांच्या ऊस नोंदी अचूकपणे केल्या जातात. ज्यामुळे तोडणी प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविण्यात येते.कोल्हे कारखाना भारतात अग्रगण होण्यासाठी छोटी छोटी पावले टाकत आहे.आगामी हंगामात दैनंदिन ६ हजार में टन उसाचे गाळप करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय संचालक मंडळ व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून घेवू असेही ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी काळाची पावले ओळखुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सहकारी साखर कारखानदारीत सर्वप्रथम अनेक पायलट प्रकल्प सुरू करून ते यशस्वी करून दाखविले, तोच ध्यास अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्याकडे असुन त्यांनी यावर कळस चढविण्याचा प्रयत्न संचालक मंडळ, व्यवस्थापन, उस उत्पादक सभासद, शेतकरी, सर्व ज्ञात अज्ञात सहका-यांच्या साथीने मार्गक्रमण करत कोल्हे कारखान्यांला देशात नावारूपाला आणण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक साहेबराव कदम, संजय होन, प्रदिप नवले, ज्ञानेश्वर परजणे, निवृत्ती बनकर, शिवाजीराव वक्ते, राजेंद्र कोळपे, बाळासाहेब नरोडे, अशोक भाकरे, राजेंद्र भाकरे, वाल्मीक भास्कर, चंद्रभान रोहोम, गोपी गायकवाड, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, चीफ इंजिनियर कुशलेशकुमार शाक्य, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, उस उत्पादक सभासद शेतकरी,खातेप्रमुख,उपखातेप्रमुख, कामगार, उसतोडणी वाहतुकदार आदि उपस्थित होते.
शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले .