वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला २२ कोटीची प्रशासकीय मान्यता –ना. आशुतोष काळे
Administrative approval of Rs. 22 crore for Wari-Kanhegaon water supply scheme. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 16.30Pm.
कोपरगाव: वारी कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने २२ कोटी ११ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिनींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. पूर्व भागातील वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा देखील समावेश होता. नागरिकांची होत असलेलीं पाण्याची अडचण व महिला भगिनींना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची थांबविण्याचा शब्द ना. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून या पाणी पुरवठा योजनेला राज्याचे पाणी पुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून मंजुरी मिळवत लवकरात निधी मिळून या योजनेचे काम सुरु व्हावे यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारकडून २२ कोटी ११ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पाणी पुरवठा योजनेचे लवकरच काम सुरु होणार असून ना. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न अल्पकाळात सोडविल्याबद्दल वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चौकट :- महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. हा त्रास वारी-कान्हेगावच्या महिला मागील अनेक वर्षापासून सोसत असून माझ्या प्रयत्नातून या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार याचे मोठे समाधान मिळत आहे. -ना. आशुतोष काळे.





