संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली कोल्हे यांना पी.एच.डी. प्रदान

संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांना पी.एच.डी. प्रदान

The director of Sanjeevani Academy, Mrs. Manali Amit Kolhe has a Ph.D. Provided

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 21Jan.2022 14.00Pm.

कोपरगांवः संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट अंतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील  सीबीएसई पॅटर्नच्या स्कूल्सच्या विश्लेषणात्मक शैक्षणिक  संशोधन कार्यावर आधारीत सादर केलेला प्रबंध व त्यावर आधारीत उत्तम सादरीकरणाला मान्यता देवुन पी.एच. डी. (विद्या वाचस्पती) ही पदवी बहाल केली आहे.

डाॅ. मनाली कोल्हे यांनी नाशिक  व अहमदनगर जिल्ह्यातील  केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाशी  संलग्न शाळांच्या संदर्भात व्यवस्थापन पध्दती, शिक्षकांचे प्रशिक्षण, अध्यापनशास्त्र  व  अध्यापन-अध्ययनाच्या पध्दती आणि त्यानुसार विध्यार्थ्यांच्या  कार्यक्षमतेवर व गुणात्मक बदलांवर विष्लेशणात्मक अभ्यास केला. हे संशोधनात्मक कार्य करीत असताना डाॅ. कोल्हे यांनी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधिल व्यवस्थापन, तेथिल सोयी सुविधा, आधुनिक सामुग्री, शिक्षकांना मिळणाऱ्या  उत्तेजनात्मक सुविधा, इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास केला. ज्या शाळांमध्ये उत्तम व्यवस्थापन आहे, शिक्षकांना प्रशिक्षण देवुन तसेच त्यांच्या गरजा पुर्ण करून अध्यापन होते, त्या शाळांमधिल विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास होतो, असा निष्कर्ष  डाॅ. कोल्हे यांनी काढला.
डाॅ. कोल्हे यांनी संजीवनी अकॅडमी, कोपरगांव, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी  व संजीवनी टाॅडलर्स, येवला येथिल संचालिका म्हणुन दैनंदिन कारभार सांभाळत संशोधन कार्यात आघाडी घेवुन मार्गदर्शक  डाॅ. विनोद मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पी. एच.डी. ही मोठी पदवीही प्राप्त केली. त्यांच्या या यशाबध्दल माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष  शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page