सई सुकाळे ची २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेड साठी निवड 

सई सुकाळे ची २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेड साठी निवड

Selection of Sai Sukale for the 26th January Republic Day Parade in Delhi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 20Jan.2022 17.20Pm.

कोपरगाव:  येथील माजी नगराध्यक्ष बाबुराव गवारे यांची पणती व शरद गवारे यांची नात व सध्या पुणे येथे कावेरी कॉलेज एस वाय बी ए ला असलेली विद्यार्थिनी सई समीर सुकाळे ची २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेड साठी निवड झाली आहे.

सई सुकाळे हिने वयाच्या १४ व्या वर्षी लहान वयात दक्षिण आफ्रिकेत अटलांटिक महासागरातील सहा मार्ग एका महिन्यात पोहून विक्रमाची नोंद केली होती त्यात तिला दोन सुवर्ण दोन सिल्वर दोन ब्रांच पदके मिळाली होती.सर्वात कमी वयात तिने नोंदवलेल्या विक्रमा बद्दल कॅप  लाँग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशन नी तिचा गौरव केला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सईचे धाडस पाहून तिच्या सागरी मोहिमेस मुख्यमंत्री निधीतून सात लाख रुपये मदत देऊ केली होती.

सईचे वडील समीर यांचा व्यवसाय आहे तर आई सुवर्णा या स्वतः ब्लॅक बेल्ट  जुडो चॅम्पियन आहेत.

जलतरण स्पर्धेत सई सुकाळे हिने या आधी इंटरनॅशनल ओपन वॉटर्स स्विमर साऊथ आफ्रिका लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर व नॅशनल स्विमर म्हणून नाव कमावले आहे. सई येत्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे असे तिची आई सुवर्णा सुकाळे यांनी सांगितले. सईच्या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page