लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार;  आरोपीला अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार;  आरोपीला अटक

Six months of torture on a minor schoolgirl for marriage; Accused arrested

या घटनेबाबत १७ वर्षीय पीडित  मुलीने  फिर्याद दिली .
हायलाइट्स:
अल्पवयीन शाळकरी मुलीवर पाच-सहा महिने अत्‍याचार, जातीवाचक बोलून जीवे मारण्याची धमकी
आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 24Jan.2022 10.30Am.

कोपरगाव  : कोपरगाव शहरातील एका नगरात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला तिथेच राहणा-या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून  मुलीवर पाच सहा महिने अत्‍याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी अनिकेत महादू शिर्के (२७)  याला रविवारी अटक करण्यात आली आहे.तसंच त्याला शुक्रवारपर्यंत (२८ जानेवारी) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश यांनी दिले.

या घटनेबाबत १७ वर्षीय पीडित शाळकरी मुलीने कोपरगाव शहर पोलिसात रविवारी (२३) रात्री उशिरा फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, गेल्या सहा-सात महिन्यापासून आरोपी युवकाने या शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी, कोपरगाव ठिकाणी लॉजवर नेऊन वेळोवेळी पाच ते सहा महिने अत्याचार केला. जातीवाचक बोलून याबाबत जर कोणाला सांगितले, तर जिवे मारण्याची धमकी दिली असे पीडित मुलीने फिर्यादी मध्ये म्हटले आहे.  सदर फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांमध्ये आरोपी विरोधात भादवि कलम ३७६,५०६  पॉक्सो ४,८,१२,अ. जा.ज. ३(१) RSW प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीं यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी हे करीत आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page