हा तर सैरभैर झालेल्या विरोधकांचा संकुचितपणा – आशिष निकुंभ
This is the narrowness of the opponents who have been sabotaged – Ashish Nikumbh
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 24Jan.2022 16.00Pm.
कोपरगाव : जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये विकास कामांचा शुभारंभ केल्याने विरोधकांचा जळफळाट झाला आहे. प्रभागातील जनतेने ज्यांना सपशेल नाकारले, त्यांनी लहान तोंडी मोठा घास घेण्याच्या भानगडीत पडू नये. हा तर सैरभैर झालेल्या विरोधकांचा संकुचितपणा असल्याची खोचक टिका युवा सेनेचे उपशहर अध्यक्ष आशिष निकुंभ यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब रूईकर यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना केली .
आशिष निकुंभ पुढे म्हणाले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भर शहरासाठी भरीव निधी आणला ठोस कामे केली तसे एकही ठोस काम अद्याप पर्यंत विद्यमान आमदारांना करता आलेले नाही असे असताना शिवसेना भाजप नगरसेवकांनी बहुमताने मिळविलेल्या निधीच्या त्या कामांशी दुरान्वये संबंध नसतानाही विद्यमान आमदार उद्घाटने करून प्रसिद्धीची हौस भागवून घेत आहे. त्यांना आमच्यावर टीका करण्यासाठी ज्यांना जनतेने तीनदा नाकारले आहे त्यांचा आधार घ्यावा लागतो यापेक्षा दुर्दैव ते काय ? असा घणाघाती सवाल निकुंभ यांनी पत्रकातून केला आहे.
२८ कामातील मलिदा बाजूला काढून जनतेचे अडीच-तीन कोटी रुपये आम्ही वाचल्याने हाती काही लागत नसल्याचे पाहून विरोधकांचा तिळपापड झालेला आहे. अशी बोचरी टीका करून निकुंभ यांनी म्हटले आहे की, विद्यमान आमदारांनी उद्घाटन करून नेमलेल्या ठेकेदाराने केलेला प्रभाग ६ बोरा घर ते मनोज अग्रवाल घर हा रस्ता उखडला असून त्या निकृष्ट कामाची समाजमाध्यमावर टीकेची झोड उठली आहे. त्यापासून तोंड लपवण्यासाठी अपयशी व्यक्तींच्या माध्यमातून दुसऱ्यांवर चिखलफेक करण्याचा प्रसंग काळे गटावर ओढवला असल्याचा आरोप निकुंभ यांनी पत्रकात शेवटी केला आहे.