ड यादीतील व सिस्टीम रिजेक्टेड घरकुल योजनेत वंचित लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण करावे-स्नेहलता कोल्हे.
Re-survey the deprived beneficiaries in the list and system rejected housing scheme – Snehalta Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue1Fab2022 16.40Pm.
कोपरगांव : तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेत १९ हजार लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रस्ताव होते त्यापैकी ५ हजार लाभार्थी केवळ सिस्टीम रिजेक्टेड म्हणून वगळण्यात आले तर ग्रामस्तरीय समितीने १४ हजार लाभार्थ्यांचे प्रस्ताव पात्र अपात्र ठरविले तर ब यादीतून वगळल्या गेलेल्यांचा समावेश क मध्ये करून त्या लाभार्थ्यांची ड यादी तयार केली, तेंव्हा याबाबत फेर सर्वेक्षण करून या वंचितांना सदर योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे ग्रामविकास व अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच ग्रामिण गृह निर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांच्याकडे केली आहे.
सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हटले आहे की, सन २०११ च्या जणगणनेनुसार पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थी यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन जोडणी माहिती अंतर्गत ५ हजार लाभार्थी सिस्टीम रिजेक्टेडनुसार अपात्र ठरले आहेत. तर ज्यांच्याकडे दुरध्वनी, भ्रमणध्वनी, दुचाकी, फ्रिज, साडेसात एकरापेक्षा जादा क्षेत्र, आदि खाली असंख्य लाभार्थी वगळण्यांत आले मात्र वस्तुस्थिती तशी नव्हती म्हणून २०१६.१७ मध्ये पुन्हा सर्व्हेक्षण करण्यांत येवून पात्र लाभार्थीची अ यादी तर ज्यांचा यात समावेश झाला नाही म्हणून ब यादी तर या दोन्ही याद्यातुन वगळल्या गेलेल्यांची ड यादी तयार करण्यांत आली. आणि ग्रामसमितीने असे १४ हजार पात्र अपात्र लाभार्थी ठरविले त्यामुळे कोपरगांव तालुक्यात या याजेनेपासुन अनेक जण वंचित राहिलेले आहे, लाभार्थी याद्यामध्ये जी माहिती दाखविण्यांत आली आहे. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही तेंव्हा कोपरगांव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांच्या तालुकास्तरीय समीतीने याचे फेर सर्व्हेक्षण करून ड यादीतील व सिस्टीम रिजेक्टेड योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवुन द्यावा व या लाभार्थ्यामधील सध्या निर्माण झालेली संभ्रमावस्था तातडीने दुर करावी असेही सौ. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.