वीज तारांचे स्पर्किंग होवुन पाच एकर उसाचे क्षेत्र भस्मसात
Five acres of sugarcane area was burnt due to sparking of power lines
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 9 Fab2022 15.00Pm.
कोपरगांव : तालुक्यातील संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी संचालक त्रंबकराव व सौ. विमल परजणे यांचे मालकीचे मौजे करंजी शिवारातील वनखात्याच्या जमीनीलगत असलेल्या पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड केलेली होती, त्यात ११ केव्हीए क्षमतेच्या वीजेची तार तुटून अचानकपणे स्पार्क होवुन बुधवारी सकाळी सदरचा उस पुर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याची सर्व भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत त्र्यंबकराव परजणे यांनी दिलेली माहिती अशी की, मौजे करंजी शिवारात गट नं ४५० व ४५१ मध्ये आपले ५ एकर उसाचे क्षेत्र असुन त्यात २६५ जातीच्या उसाची लागवड करण्यांत आली होती तो परिपक्व होवुन चालु गळीतास फेब्रुवारी अखेर येणार होता, परंतु ९ फेब्रुवारी बुधवारी सकाळी ११ केव्हीए वीज क्षमतेच्या वाहिन्या अचानकपणे तुटून उसावर पडल्या त्यामुळे उसाने पेट घेतला, आगीचे स्वरुप रौद्र होते, त्यात सर्व ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे, याबाबत सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांच्या अग्निशमन यंत्रणेने पेटलेला उस विझविण्यांचा अटोकाट प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही, सर्वच्या सर्व पाच एकर क्षेत्रावरील परिपक्व झालेला उस जळून गेला आहे त्याचे रितसर पंचनामे संवत्सर येथील वीज उपअभियंते श्री बोरसे यांनी केले आहे आहेत. , तर महसूल खात्याचे अधिकारी व संबधिताना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे, तलाठी पंचनामा सुरू आहे असे ते म्हणाले.