समाजभूषण निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
Samajbhushan Nivruti Maharaj Indorikar felicitated on behalf of Sanjeevani Udyog Samuha
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Fab2022 17:40Pm.
कोपरगांव: समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षापासुन किर्तन सेवेतुन समाजातील अनिष्ठ प्रथावर प्रहार करून तरूणांना सत्कर्माची शिकवण देण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर रामवाडी परिसरातील बिरोबा महाराजांच्या यात्रेनिमीत्त निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता त्यात त्यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संस्कार आणि अध्यात्माच्या जोडीला प्रबोधन जनजागृतीची साथ मिळाल्यास त्यातुन समाजाचे हित मोठया प्रमाणांत साधता येते. समाजभूषण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून किर्तन सेवेतुन ते तळागाळातील उपेक्षीतापर्यंत पोहोचविले आहे त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदुर पोहोचली असल्याचे ते म्हणाले.
याप्रंसंगी संचालक फकीरराव बोरणारे, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, संभाजीराव बोरनारे, प्रकाश गायकवाड, विलास कासार, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद परजणे, सुरेश कासार, संदिप मैंद, अनुप शिंदे, संदिप वाळुंज, विशाल कासार, अविनाश बोरणारे, राजेंद्र बोरणारे, शिवाजी आसूदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक फकिरराव बोरनारे यांनी आभार मानले.