शिर्डीला नगरपरिषदेचा दर्जा, शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण

शिर्डीला नगरपरिषदेचा दर्जा, शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण

Shirdi Municipal Council status, a golden moment for Shirdikars

शिर्डीतील सर्वपक्षीयांनी ना. आशुतोष काळेंचा केला सत्कारNot all parties in Shirdi. Ashutosh Kale was felicitated

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Fab2022 17:30Pm.

कोपरगाव : शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कुठल्याही हरकती न आल्याने शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद दर्जा  मिळावा ही अधिसूचना जाहीर झाल्याने शिर्डी करांसाठी हा सुवर्णक्षण असून असल्याने सर्व पक्षांच्या वतीने साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.

कोट्यावधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर व्हावे अशी तमाम शिर्डीकरांची इच्छा होती. या मागणीची दखल घेत नामदार काळे यांनी शिर्डी शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक वेळा बैठका घेऊन शिर्डी नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन नगरविकास खात्याने शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देणेबाबत तातडीने अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्याबाबत ग्रामस्थांनी कोणताही आक्षेप घेवू नये असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी केले होते. त्या आवाहनाला शिर्डी ग्रामस्थांनी प्रतिसाद देत कोणताही आक्षेप न घेतल्यामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिर्डी नगरपंचायत नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा होऊन शिर्डी नगरपरिषद झाली. हा शिर्डीकरांसाठी सुवर्णक्षण असल्यामुळे शिर्डी नगरपरिषद होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ना. आशुतोष काळे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.

यावेळी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, राकेश कोते, निलेश कोते, गोविंद कोते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, दत्तात्रय कोते, निलेश शिंदे, अविनाश शेळके, सचिन कोते, आप्पासाहेब कोते, अशोक कोते, महेंद्र शेळके, भागवत कोते, दादासाहेब गोंदकर, प्रमोद गोंदकर, पारेश्वर कोते, मुख्य कार्यकारी अधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. शिर्डी नगरपंचायत नगरपरिषद झाल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page