नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दर्जेदार रस्ते तयार करून घेणार – ना. आशुतोष काळे

नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दर्जेदार रस्ते तयार करून घेणार – ना. आशुतोष काळे

Build quality roads as expected by citizens – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon21 Fab2022 17:40Pm.

कोपरगाव :नागरिकांच्या सूचनांचा आदर करून रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत गुणवत्ता राखण्यासाठी सबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दर्जेदार रस्ते तयार करून घेणार असल्याचे श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी शहरातील प्रगतिपथावर असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर स्पष्ट केले . तसेच रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे असे आवाहन नामदार आशुतोष काळे यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केली.

त्यावेळी त्यांच्यासमवेत सुनील गंगुले, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, जावेद शेख, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, ऋषिकेश खैरनार, विकि जोशी, गणेश लकारे, गणेश बोराडे, विजय शिंदे, श्याम ओढेकर, प्रकाश मोराडे, अनिल लचुरे, दिनेश संत, विजय शिदोरे, नगरपपरिषद अभियंता सुनील ताजवे, सहाय्यक अभियंता हर्षवर्धन सुराळकर, निलेश बुचकुले, ठेकेदार एस. के. येवले आदी उपस्थित होते.

यावेळी नामदार आशुतोष काळे ठेकेदाराची बोलताना म्हणाले, रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ठेकेदारांनी काळजी घ्यावी. रस्त्यांसाठी निधी वारंवार मिळत नाही त्यामुळे होणारे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते.असेही त्यांनी यावेळी उपस्थित ठेकेदारांना सुनावले, 

Leave a Reply

You cannot copy content of this page