केपीएल क्रिकेट स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत – ना. आशुतोष काळे
Future star players should be formed from KPL cricket tournament – no. Ashutosh Kale
केपीएल क्रिकेट नामदार चषक वास्तव फाउंडेशन पटकाविला The KPL Cricket Namdar Cup was won by Vastav Foundation
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 28 Fab2022 17:20Pm.
कोपरगाव: मैदानी खेळातील संघर्ष, स्पर्धा हि मैदानापुरतीच मर्यादित असावी. या स्पर्धेतून खेळाडूंनी अनुभव घेतले पाहिजे व या अनुभवाच्या जोरावर जिल्हा, राज्य व देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. केपीएल क्रिकेट स्पर्धा देखील उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक व्यासपीठ असून या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यातील स्टार खेळाडू घडावेत अशी अपेक्षा श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली
कोपरगाव येथे आयोजित कोपरगाव प्रीमिअर लीग (केपीएल) क्रिकेट नामदार चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. वास्तव फाउंडेशन व सागर ट्रेडिंग इलेवन्स या उभय संघामध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्याची नाणेफेक ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येवून स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यामध्ये नामदार चषक व पहिल्या बक्षिसाचा मानकरी वास्तव फाउंडेशन (कोपरगाव) ग्रुप ठरला, द्वितीय बक्षीस सागर ट्रेडिंग इलेवन्स,तृतीय बक्षीस अश्वमेध रायडर्स, चतुर्थ बक्षीस पंकज इलेवन्स या संघाने पटकाविले. मॅन ऑफ द सिरीज आलिम पठाण, बेस्ट बॅट्समन वैभवजी पाटील
या सर्धेत प्रथम बक्षिस वास्तव फाउंडेशन (कोपरगाव) ग्रुपने पटकावले असून द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे सागर ट्रेडिंग इलेवन्स (कोपरगाव), अश्वमेध रायडर्स (कोपरगाव) व पंकज इलेवन्स (चांदेकसारे) यांनी पटकावले आहे. तसेच मॅन ऑफ द सेरिस आलिमभाई पठाण, बेस्ट बॅट्समन वैभव पाटील तर बेस्ट बॉलरचा मान बंटी जाधव यांना मिळाला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, कालू आव्हाड, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, जावेद शेख, राहुल देवळालीकर, सनी वाघ, नितीश बोरुडे, सिद्धार्थ शेळके, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, भाऊसाहेब भाबड, अमोल गिरमे, संदीप कपिले, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, विलास चव्हाण, आकाश डागा, विकि जोशी, विशाल जगताप, इम्तियाज अत्तार, संदीप सावतडकर, राजेंद्र आभाळे, अय्युब कच्छी, सागर लकारे, अमोल काले, रोशन खैरनार, एकनाथ गंगूले, महेश उदावंत, राजेंद्र जोशी, विजय नागरे, रहेमान कुरेशी, विशाल निकम, काकासाहेब गोर्डे, हेमंत बोराडे, शफीक शेख, सोमनाथ आढाव, विष्णू शिंदे, विलास आव्हाड, पंकज पुंगळ, संजय जाधव, बाळासाहेब शिंदे, कैलास मंजुळ, आयोजक दादा पोटे, सुनील मुळेकर, दिलीप पोटे, अमोल वाघडकर, गोविंद वाकचौरे, वसीम शेख, शाहरुख खाटिक, जुनेद खाटिक, संदीप पाईक, अलोक तिवारी, मानव काते, तुषार विध्वंस, पवन शिंदे, हाफिज शेख आदींसह सहभागी खेळाडू व क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.