१६ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी – ना. आशुतोष काळे

१६ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी – ना. आशुतोष काळे

Approval for 16 km roads – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 7 Mar 2022 17:40Pm.

कोपरगाव : मतदार संघातील १४ गावातील १६ किलोमीटर रस्त्यांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या २०२२/२३ च्या वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत २०२२/२३ च्या वार्षिक आराखड्यामध्ये समावेश व्हावा या पाठ्पुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे.

यामध्ये डाऊच बु.ते देर्डे चांदवड रोड ०२ किमी, मोर्वीस येथील सोपान जासुदार पगारे यांचे शेत ते गुलाब निवृत्ती सरडे यांचे शेत ०२ किमी, मल्हारवाडी ते मनेगाव रस्ता ०१ किमी, घारी ते हिंगणवेढे वस्ती जोड रस्ता ०१ किमी, वारी येथील चोंडीनाला ते ठोंबरे वस्ती ०१ किमी, धोत्रे ते लाख रस्ता ०१ किमी, मंजूर येथील राज्य महामार्ग ०७ ते शिवरस्ता ०१ किमी, उक्कडगाव आपेगाव रस्ता उक्कडगाव रोड ०१ किमी, कोळगाव थडी येथील खंडोबा वस्ती रोड बाळासाहेब चव्हाण शेत ते अशोक चव्हाण यांचे शेत ०१ किमी, तिळवणी उक्कडगाव रस्ता तिळवणी रोड ०१ किमी, मढी खु. येथील जि.प. शाळा वस्ती ते आण्णा सूर्यभान आभाळे घर ०१ किमी, धारणगाव ते सोनारी शिवरस्ता ०१ किमी, अंचलगाव ते बोलकी शिवरस्ता ०१ किमी, जेऊर पाटोदा गावठाण कोपरगाव रस्ता ०१ किमी या रस्त्यांचा समावेश आहे.

ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे, रोजगार हमी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page