पोहेगावसाठी साडेतीन कोटीची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर -नितिन औताडे
An additional water supply scheme of Rs 3.5 crore has been approved for Pohegaon – Nitin Autade
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 17:00Pm.
कोपरगाव: पोहेगांव ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यातुन जिल्हा परिषदेच्या कृतिआराखडा मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत ३ कोटी ४६ लाख ५४ हजार ९४ रुपयांची वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. ना. गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री शंकरराव गडाख, खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली असल्याची माहिती शिवसेना नेते नितीन औताडे यांनी दिली.
गेल्या २७ वर्षापासून नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत वाटचाल करत असताना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गावात राबवून गावचा कायापालट केला.
रस्ते वीज पाणी व आरोग्य या मूलभूत सुविधा गावात उपलब्ध असल्याने गावची बाजारपेठ फुलली. पिण्याचे पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना वीस ते बावीस दिवसानंतर पाणी मिळते मात्र पोहेगांव ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना याबाबत अपवाद असून ऐन उन्हाळ्यात व दुष्काळातही नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुबलक पाणी मिळते.
पोहेगाव मध्ये असलेल्या सुविधांचा आधार घेत अनेक व्यापारी नोकरदार यांनी येथे राहण्यास पसंती दिली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुख्य जलवाहिनी जुनी झाल्याने पाणी शुद्धीकरणाची क्षमता कमी पडत असल्याने वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यासाठी नितीन औताडे यांनी सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्राम विकास अधिकारी प्रशांत बरबडे व ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वाढीव १० लक्ष लिटर क्षमतेची प्रतिदिन पाणीपुरवठा योजनेची जलशुद्धीकरण योजना मंजूर झाली.ही योजना मंजूर झाल्याने पोहेगाव करांना पुढील पंचवीस वर्ष पाणी टंचाई भासणार नाही असेही नितिन औताडे यांनी सांगितले.