विवेक कोल्हे यांना शंभू गर्जना पुरस्कार जाहीर जेऊर कुंभारी ग्रामस्थांकडुन गौरव
Shambhu Garjana Award announced to Vivek Kolhe by Jeur Kumbhari villagers
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Tur 8 Mar 2022 17:20Pm.
कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विवेक कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून शंभूगर्जना पुरस्कार जाहीर झाला याबद्दल जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्यावतीने जालिंदर चव्हाण बाळासाहेब वक्ते सुधाकर,वक्ते यांनी पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.
११ मार्च २०२२ रोजी बलिदान स्मृतीदिना चे औचित्य साधुन किल्ले धर्मवीरगड ( बहादुर गड )तालुका श्रीगोंदा येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
कोरोना काळामध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांनी उल्लेखनीय काम केले असल्याची माहिती उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी यावेळी दिली.
यावेळी विजय शिंदे, पोपट शिंदे, गिरीधर गुरसळ, रावसाहेब गोसावी, बाळासाहेब देवकर, दादासाहेब चव्हाण, गोरक चव्हाण, जयराम चव्हाण,अरविंद जाधव, भिकाभाऊ चव्हाण, भानुदास वक्ते, पोपट सोळके, राजेंद्र वक्ते, बलवीर गरूड, सुनिल वक्ते, विजय सोळके, बाळासाहेब सोळके, वसंत दादंडे, संजय वक्ते, संतोष वक्ते, महेश चव्हाण, राहुल वक्ते, यांचा सह जेऊर कुंभारी गावातील २५० ते ३०० युवकां सह जेऊर कुंभारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.