एस एस जी एम कॉलेजात वक्तृत्व स्पर्धा परितोषिक वितरण

एस एस जी एम कॉलेजात वक्तृत्व स्पर्धा परितोषिक वितरण

Eloquence Competition Prize Distribution in SSGM College

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 9 Mar 2022 18:20Pm.

कोपरगाव : सद्गुरू गंगागीर महाराज कॉलेजात कै. सौ. सुशीलामाई काळे यांचे स्मृती प्रीत्यर्थ आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा परितोषिक वितरण व विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध शाँर्ट टर्म कोर्स सुरु करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश सानप होते. प्रमुख अतिथी चैताली काळे या होत्या.

यावेळी चैताली काळे म्हणाल्या, आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. विकासाच्या अनेक क्षेत्रात आपल्यातील बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी खूप मोठी आगेकूच करीत स्त्री -पुरुष या भेदातीत भावनेला फाटा देण्याचे काम केले आहे. कारण महिलांना निसर्गत:च अनेक योग्यतांचे वरदान लाभले आहे. एकूणच स्त्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. माईंच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण महिला दिनी होते हे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी अँड. पूनम गुजराथी म्हणाल्या की, आपल्या देशातील स्त्री सुधारकांनी केलेले महिलांविषयक कार्य महत्वाचे असून महिलांनी आजच्या दिनी हे कार्य लक्षात घ्यावे. आज स्त्रियांसाठी अनेक कायदे निर्माण होत होत आहेत. महिलांना महत्वाच्या कायद्यांविषयी महिती असायला हवी.

प्राचार्य डॉ. रमेश सानप म्हणाले की,समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रतिभा, प्रतिमा आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या तीन गोष्टींमुळेच माणूस जीवनात यशस्वी होतो. जागतिक महिला दिनी सर्व महिलांनी या तीन गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देत स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध बनवावे.

सदर प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. व विद्यार्थिनींसाठी विविध शाँर्ट टर्म कोर्सेस सूरू करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्रद्धा लोखंडे व वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ. सौ. पी. व्ही. रांधवणे यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाल वाचन डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. छाया शिंदे यांनी केले. प्रा. डॉ. योगिता भिलोरे यांनी आभार मानले.

सदर प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, उपप्राचार्य डॉ. विजय निकम, उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेतर महिलांसह विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page