श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
Celebration of International Women’s Day at Mr. Gokulchandji Vidyalaya
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Wed 9 Mar 2022 18:,30Pm.
कोपरगांव – श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत मंगळवारी हा जागतिक महिला दिन उत्साहाने संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या जिल्हा बँक माजी संचालक सौ. चैताली काळे होत्या.
कोपरगाव अमरधाम येथे काम करणाऱ्या राधा जाधव यांचा श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय पतसंस्थेच्या वतीने सौ. चैताली काळे यांच्या हस्ते ५,००० रुपये,शाल पुप्ष देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुधा कैलास ठोळे होत्या.
चैताली काळे यांनी विदयालयाने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आभार मानले.महिलांनी आपले अधिकार मिळवण्या साठी वेळप्रसंगी संघर्ष केला पाहीजे असे त्यांनी सुचवले.
प्रारंभी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.
यावेळी सौ. शोभा चंद्रकांत ठोळे ,श्रीमती सुवर्णा सुभाष अजमेरे, सौ. प्रिया आनंद ठोळे, सौ. सोनल अमोल अजमेरे ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार सौ.एस.एस.मालपुरे यांनी मानले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी महीला दिना निमित्तानं सर्व शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक आर.बी. गायकवाड, यु.एस.रायते, जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर, ए.बी.अमृतकर ,ए.जे.कोताडे, के.एस. गोसावी, डी.पी.कुडके डी.व्ही.विरकर, ए.के.काले आदी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.