वीज बिलाची सक्ती थांबवा ; आधी संभ्रम दूर करा,- सौ स्नेहलता कोल्हे
ग्राहकांना हजारो रुपयांचं बिल पाठवल्याने नागरिक संतप्त
वृत्तवेध ऑनलाइन : 15 July 2020
By : Rajendra Salkar
कोपरगाव : घरगुती ग्राहकांना सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असून वीज बिल भरण्याची सक्ती केली जात आहे. हे अयोग्य असून, ही सक्ती तत्काळ थांबवावी, व आधी बिलाबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी विजवितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
सौ. कोल्हे यांनी म्हटलं की, देशभरात कोरोना थैमानामुळे रुग्ण वाढत आहे. आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशात एकदम तीन महिन्यांची अव्वाच्या सव्वा विजबिले आल्यामुळे ती एकरकमी भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाकडुन पाहिजे ती मदत होत नाही.
अत्यल्प पावसामुळे अद्यापही विहिरींना पाणी नाही. ज्या विहिरींना पाणी आहे, अशा भागातील वीज रोहित्रांवर जादा भार असल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. ढिसाळ कारभारामुळे वारंवार लाईट जाणे, रोहिञ जळणे, कमी जास्त दाबामुळे विजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच अवास्तव विजबिले आल्यामुळे या रोषात भर पडली आहे. त्यात ही सक्ती अन्याय करणारी असल्याचे सौ कोल्हे यांनी म्हटले आहे.
ग्राहकांचे शंकानिरसन करणे हे विजवितरण कंपनीची जबाबदारी आहेत. आलेले विजबिल ग्राहकाने आर्थिक परिस्थितीमुळे भरु न शकल्यामुळे ग्राहकाचे विजतोडणी देखील होवु शकते, त्यामुळे विजवितरण कंपनीने ग्राहकाला आलेल्या विजबिलाबाबत संभ्रम दुर करावा. कोणत्याही ग्राहकांवर अन्याय होणार याची दक्षता विजवितरण कंपनीने घ्यावी. असेही सौ. कोल्हे यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे






