प्रा. मतिन इनामदार यांचे निधन

प्रा. मतिन इनामदार यांचे निधन

एक कर्तृत्ववान प्राद्यापक गमविला –  नितीनदादा कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन 16 July 2020

By : Rajendra Salkar

कोपरगाव : मृत्यु हा अटळ असतो परंतु त्यांच्या इतक्या लवकर जाण्याने आम्ही एक कर्तृत्ववान प्राद्यापक गमविला असल्याचा भावना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष, नितीनदादा कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केल्या,त्यांचे शिक्षण संजीवनी मध्येच झाले आणि त्यांनी येथेच सेवा देण्याचे ठरविले. यामुळे ते संजीवनी कुटूंबाचे सदस्य होते. याचे दुःख त्यांच्या कुटूंबियांबरोबरच संपुर्ण संजीवनी परीवाराला झाले असल्याचे ते म्हणाले,

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील प्रा. मतिन इनामदार (वय ३५ वर्षे ) यांचे मंगळवारी (१४ जुलै) रोजी पुणे येथिल एका हाॅस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व ५ वर्षांचा मुलगा आहे.

प्रा. मतिन इनामदार नाविन्याचा शोध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानात प्रयोगशील हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व, एक मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे गुरुतुल्य तरूण तडफदार प्राध्यापक मृत्युशी कडवी झुंज देत हरपला आहे.अशा शब्दांत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी, अमित कोल्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

नियतीचा खेळ त्यांच्या कुटूंबियांइतकाच संपुर्ण संजीवनी परीवाराला वेदनादायी असून त्यांच्या कुटूंबियांना व संजीवनी परीवाराला या दुःखातुन सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो, ही प्रार्थना ! 

 

कै. प्रा. इनामदार यांनी संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक मधुन इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगचा डीप्लोमा केला. याच शाखेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवुन संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये ऑगस्ट , २०१० मध्ये मध्ये लेक्चरर पदावर रूजु झाले. त्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना संजीवनी अभियंत्रिकी महाविद्यालयामध्ये पदोन्नती दिली. मागील दीड आठवड्यापासून ते आजारी होते. त्यात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या भव्य परीवारामध्ये शोककळा पसरली आहे.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page