संजीवनी अकॅडमीचा निकाल १०० टक्के, कार्तिक ठोंबरे टॉपर, – सौ. मनाली कोल्हे
१०० पैकी १००(कट टू कट)
चैतन्य अग्रवाल सोशल सायन्समध्ये , तर यशश्री चौधरी व कार्तिक ठोंबरे संस्कृतमध्ये बोर्डात पहिले,
संजीवनी ॲकॅडमीची १००% निकालाची परंपरा कायम
CBSE Result 2020
वृत्तवेध ऑनलाइन 15 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (सीबीएसई) संजीवनी अकॅडमी चा १०० % निकाल लागला असून कार्तिक ठोंबरे हा ९६ टक्के गुण मिळवून टॉपर आला आहे. १०० पैकी १००(कट टू कट) गुण मिळवून चैतन्य अग्रवाल सोशल सायन्समध्ये , तर यशश्री चौधरी व कार्तिक ठोंबरे संस्कृतमध्ये बोर्डात पहिले आले आहेत अशी माहिती स्कुलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी दिली आहे.
चैतन्य अग्रवाल याने ९४ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यशश्री चौधरी हिला ९३. ६० टक्के गुण मिळुन ती तिसऱ्या गुणानुक्रमाने उत्तिर्ण झाली. आयुशी कापगते व भाविका वन्ने यांनी अनुक्रमे ९३. ४० टक्के व ९१. २० टक्के गुण मिळवुन स्कुलमध्ये अनुक्रमे ४ था व ५ वा क्रमांक मिळविला. यात ६ विध्यार्थ्यानी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले तर ७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्यांमध्ये गुण मिळविले आहे. ७० ते ८० टक्यांमध्ये १३ विध्यार्थी उत्तिर्ण झाले आहे. चैतन्य अग्रवाल ने सोशल सायन्स विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन या विषयात संपुर्ण बोर्डात पहिला क्रमांक मिळविला तर यशश्री चौधरी व कार्तिक ठोंबरे यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन या विषयात बोर्डात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे , कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, व स्कुलच्या संचालिका सौ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत व यशस्वी विध्यार्थी व प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम व सर्व शिक्षकांचेे अभिनंदन केले आहे.
Post Views:
576