श्री साई चरित्र : साईबाबांना जीव लावा, शिर्डी समृद्ध होईल-इति गंगागीर महाराज

श्री साई चरित्र : साईबाबांना जीव लावा, शिर्डी समृद्ध होईल-इति गंगागीर महाराज

Shri Sai Charitra: Bring Sai Baba to life, Shirdi will prosper – Iti Gangagir Maharaj

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 13 Mar 2022 16:,19Pm.

 

साई मंदिर सभामंडपात गंगागिरी महाराज व उपासनी महाराज यांच्या प्रतिमा ह.भ.प. रामगिरी महाराज व ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या.

कोपरगाव : साई परिक्रमाच्या मुहूर्तावर रविवारी (१३) रोजी साई मंदिर सभामंडपात गंगागिरी महाराज व उपासनी महाराज यांच्या प्रतिमा ह.भ.प. रामगिरी महाराज व ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. याप्रसंगी समकालीन संत गंगागीर महाराज यांनी साईबाबांना पाहताच हे रत्न इकडे कसे ? असे उदगार काढून साईबाबांना जीव लावा, शिर्डी समृद्ध होईल, असे त्यावेळी शिर्डी ग्रामस्थांना सांगितल्याचे साई चरित्रात असल्याचा दाखला  सरला बेट मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी यावेळी दिला.

श्री साईबाबा संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे व विश्वस्त मंडळांने शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराज हे साईबाबांचे शिष्य होते. साईबाबांच्या आदेशानुसार श्री उपासनी महाराजांनी तपश्चर्या केली आहे. याचा साई चरित्र उल्लेख आहे. श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात यावी अशी असंख्य साई भक्तांची मागणी रविवारी (१३) रोजी साई परिक्रमेच्या निमित्ताने आज पूर्ण केली आहे

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. एकनाथ गोंदकर, ॲड. सुहास आहेर, सचिन गुजर, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांच्या उपस्थितीत साई मंदिराच्या सभामंडपात श्री गंगागिरी महाराज व श्री उपासनी महाराजांची प्रतिमा लावण्यात आली आहे. याने भक्तांची मागणी पूर्ण झाली असून त्यांनी विश्वस्त मंडळाचे आभार मानले आहे. त्याचबरोबर साईबाबांचे समकालीन असलेले साई भक्त कै. श्री वामन माणकोजी पा. गोंदकर व कै. श्री लक्ष्मणराव (मामा) रत्नपारखी यांच्या देखील प्रतिमा लावण्यात आल्या.

या साई परिक्रमेसाठी साधु संत, असंख्य भक्त व शिर्डी ग्रामस्थ अध्यक्ष ना. आशुतोष काळे व विश्वस्त हे देखील साई परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page