देवेंद्र फडणवीसांना पोलीस नोटीस; लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली- सौ. स्नेहलता कोल्हे
Police notice to Devendra Fadnavis; Trample on the principles of democracy – Mrs. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 13 Mar 2022 16:,23Pm.
कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या तालावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी कारवाई ही सूडबुद्धीने होत आहे. दडपशाहीचा निंदनीय व निषेधार्ह प्रकार लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली त्याची जोरदार टीका भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे पत्रकार यांच्याशी बोलताना केली.
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. कोपरगांव भाजपच्यावतीने रविवारी पक्ष कार्यालयासमोर नोटीसीची होळी करून आंदोलनं केले.
शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले की, राज्यात अनेक भ्रष्टाचारी मंत्री महाविकास आघाडी शासनात सामील आहेत, त्यातील काही तुरुंगाची हवा खात आहे तर काही आत जाण्यांच्या तयारीत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला असुन त्यांनी उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, आणि माणिपुर चार विधानसभा निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करणाऱ्यांच्या मनसुब्यावर बुलडोझर फिरविला पण अजुनही शेखचिल्लीचे मनोरे उभे करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकचे सत्ता स्वप्न पहात आहेत., त्यांना भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आगामी प्रत्येक निवडणुकीत नक्कीच धूळ चारणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेकांना धडकी भरली आहे तर महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची व खोट्या केसेसची विधिमंडळात पोलखोल केल्याने अनेकांचा जळफळाट झाला आहे. खरेपणाने वागणाऱ्या फडणवीसांना पोलीस नोटीस बजावुन त्यांच्यावर एक प्रकारचे दडपण आणण्यांचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहे, त्याचा आम्ही धिक्कार करून तीव्र शब्दात निषेध नोंदवितो असे ते म्हणाले.
या प्रसंगी विजय आढाव, भायुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, विनोद राक्षे, राजेंद्र बागूल, खालीक कुरेशी, रवींद्र रोहमारे, महावीर दगडे, दिपक राऊत, जयेश बडवे, .सतीश रानोडे, किरण सुपेकर, दादाभाऊ नाईकवाडे, निलेश बोऱ्हाडे, शंकर बिऱ्हाडे, चंद्रकांत वाघमारे, विजय चव्हाणके, राजेंद्र गायकवाड, प्रसाद पऱ्हे, फकिरमहमंद पहिलवान, अनिल जाधव, रवी शेलार, .संतोष नेरे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी अविनाश पाठक यांनी आभार मानले.