उक्कडगावच्या उपसरपंच कोल्हे गटाच्या सौ. मंगल नंदू शिंदे

उक्कडगावच्या उपसरपंच कोल्हे गटाच्या सौ. मंगल नंदू शिंदे

माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करणार –
सौ. मंगल शिंदे

वृत्तवेध ऑनलाईन 16  July  2020

By Rajendra Salkar

कोपरगाव : तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. मंगल नंदू शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

नवनिर्वाचित उपसरपंच ह्या उक्कडगाव रेणुका माता देवस्थान चे पुजारी नंदू शिंदे यांच्या पत्नी आहेत.

या निवडीबद्दल त्यांचे माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, सरपंच उज्वला निकम, गोरख निकम, दादासाहेब बबनराव निकम, मदन बबनराव निकम, श्रीरंग निकम, हेमंत बाबासाहेब निकम, ज्ञानेश्वर गंगाधर निकम, शकुंतला वाल्मीक त्रिभुवन कविता भाऊसाहेब निकम, ग्रामसेवक श्री. पगारे आदींनी अभिनंदन केले. नवनिर्वाचित उपसरपंच सौ. निकम यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना त्या म्हणाल्या की, गावच्या विकासासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहू.

Leave a Reply

You cannot copy content of this page