कोरोना ग्रस्तांना  मदतीचा हात गोखले दाम्पत्यांकडुन नऊ मुलींचे पालकत्व

कोरोना ग्रस्तांना  मदतीचा हात गोखले दाम्पत्यांकडुन नऊ मुलींचे पालकत्व

A helping hand to the Corona victims Guardianship of nine daughters by the Gokhale couple

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sun 13 Mar 2022 17:,33Pm.

कोपरगाव कोरोनाच्या जागतिक संकटानंतर सर्व सामान्य कुटुंबियांचे आर्थिक गणित ढासळून संसाराचा गाडाच उद्वस्त झाला. अश्या कठीण प्रसंगी आर्थिक दुर्ष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबियांच्या अकरा वर्षे वयोगटातील नऊ मुलींचे पालकत्व येथील गोखले दाम्पत्यांने २३ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वीकारून सुनील जनार्दन गोखले व सौ.विद्या गोखले यांनी मदतीचा हात देत समाजापुढे आदर्श ठेवला.

ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात हा आगळा वेगळा पालकत्व सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

पालकत्व घेतलेल्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत दहा वर्षांनी देणार असल्याचे सांगितले. पालकत्व घेतलेल्या मुलींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ब्रह्मकुमारी कोपरगावच्या चैताली दीदी ,ज्योती दीदी ,आदर्श विद्यालय शिर्डीचे अध्यक्ष डॉ.प्रबोध जोशी , ॲड .रविकाका बोरावके, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,सुधाप्पा कुलकर्णी, श्रीकांत बागुल,आदर्श विद्यालयाचे सचिव अशोक गोंदकर,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, सुनील व सौ विद्या गोखले उपस्थित होते.
पालकत्वाची संकल्पना सांगताना सुनील गोखले म्हणाले, २०१८ साली मुलगा ओम याच्या व्रतबंधसोहळ्या प्रसंगी वनवासी आश्रमच्या तीन व भंडारदरा येथील एक असे चार मुलींचे पालकत्व घेतले होते. आपण आपल्या देशाचे काही तरी देणे लागतो व माणूस म्हणून माणसासाठी काम करायला पाहिजे याच हेतूने कार्य केले. कोणाला तरी आपण हवंय याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. माणूस म्हणून जगले पाहिजे. या सर्व सामाजिक कार्यात पत्नीचे मोठे सहकार्य व साथ मिळत असल्याचे गोखले यांनी आवर्जून सांगितले.
ॲड. रविकाका बोरावके यांनी गोखले कुटुंबियांचे अनुभव कथन करत या दाम्पत्यांनी सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून हा उपक्रम त्यांनी पुढे चालवावा ,आम्ही तुझ्या बरोबर आहोत काळजी करू नका. समाज कुठे ही कमी पडणार नाही असे सांगितले.
प्रबोध जोशी म्हणाले,गोखले दाम्पत्याचे दातृत्व मोठे असून त्यांच्या आई वडिलांची पुण्याई व संस्कारातून हा उपक्रम पार पडत आहे.
माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हा उपक्रम गोखले दाम्पत्य त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून नव्हे तर गोखले दाम्पत्य आपल्यावर यातून संस्कार करत आहे.
प्रसाद नाईक यांनी कुठल्याही अडचणी प्रसंगी व सदर उपक्रम मार्गी लागावा यासाठी गोखले कुटुंबियांसमवेत समाज नेहमी सोबत राहील अशी ग्वाही दिली.
रजनी गुजराथी,अशोक गोंदकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व समाजातील मान्यवर, पदाधिकारी ,कार्यकर्ते, नागरिक ,मित्र या कार्यक्रमाला उपस्थित होते.

चौकट– कशी देणार मदत…
सदर नऊ मुलींचे पालकत्व स्वीकारताना या मुलींच्या नावावर दरमहा ठराविक रक्कम गुंतवणूक करणार असून त्यातून वयाच्या २२ व्या वर्षी त्यांच्या लग्नानिमित्त प्रत्येकी पन्नास हजार रुपये देणार असल्याचे गोखले यांनी सांगितले. आदर्श विद्यालय शिर्डी तीन, कोपरगाव नगरपालिका माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील पाच व गोकुळचंद विद्यालयातील एक अश्या नऊ मुलींचे पालकत्व घेण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page