कोपरगाव –
या योजनेचे काम पुर्ण झाले असुन या योजनेच्या साठवण तलावात आज पाणी सोडण्यात आले, त्याचे जलपुजन करतांना या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटले.
प. पु. सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशिर्वादाने कोकमठाण गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात मी यशस्वी झाले, याचा मला मनस्वी आनंद झाला असल्याचे प्रतिपादन माजी आ. सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या कोकमठाण पुरक पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण होऊन या योजनेच्या साठवण तलावात आज पाणी सोडण्यात आले, यावेळी जलपुजन आत्मा मालीक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज, सौ. स्नेहलता कोल्हे आणि आत्मा मालिक परिवारातील संतगण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
सौ. कोल्हे म्हणाले की, सर्वाधिक लोकसंख्या, विस्तीर्ण क्षेत्रफळ आत्मा मालिक ध्यानपीठ असलेल्या जंगली महाराज आश्रमातील भक्तगणांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे होते. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मतदार संघातील विविध विकास कामे करतांना या योजनेच्या कामाला प्राधान्य दिले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 10 हजार कोटी रूपयाच्या पाणी योजनेतुन ना बबनराव लोणीकर 8 कोटी 35 लाख रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली, ना. प्रकाश मेहता यांचे सहकार्य त्यानंतर योजनेसाठी जागेचा प्रश्न निर्माण होताच आश्रमालगत असलेल्या शेतीमहामंडळाची गट नंबर 341/6 मधील 3.33 हेक्टर जमीन या योजनेसाठी मिळविली.
यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज म्हणाले, यापरिसरातील पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आम्हांला सहकार्य केले, यापुर्वीच्या पाणी योजनांसाठी त्यांची मदत झालेली आहे, आणि या नवीन योजनेसाठी माजी आ सौ स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान आम्हांला लाभले असल्याने अत्यंत कमी कालावधीत ही योजना पुर्ण होऊन आज साठवण तलावात पाणी सोडण्यात आले,हा आमच्यासाठी निश्चितच भाग्याचा क्षण असल्याचे म्हणाले.
यावेळी आत्मा मलिक ध्यानपीठाचे संतगण, पदाधिकारी, कोकमठाण पाणी पुरवठा अध्यक्ष शरदनाना थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, आश्रमचे हनुमंत भोंगळे, सरपंच पोपटराव पवार, उपसरपंच अनिता रक्ताटे, माजी सरपंच सौ अलका लोंढे, हरीभाऊ लोहकणे, जालींदर निखाडे, मारुती बिडवे, अॕड महेश भिडे, वैभव नेटकर, विलास देशमुख, राजेंद्र रक्ताटे, संदीप चाळक, उत्तम चव्हाण, रविंद्र चाळक, आप्पासाहेब आबक, किसन फटांगरे यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळुन उपस्थित होते.