सोमय्या कॉलेजला भूगोल रसायन प्राणी शास्त्र विषय संशोधनास विद्यापीठाची मान्यता -डॉ. प्रा. यादव
कोपरगाव.
येथील के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल, रसायनशास्र व प्राणिशास्र विषयांचे पी.एचडी. संशोधन केंद्र सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
महाविद्यालयात या अगोदर मागील तीन वर्षापूर्वी हिंदी विषयाचे पी.एचडी. संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आता महाविद्यालयात एकूण चार पी.एचडी. संशोधन केंद्र झाले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पी.एचडी. पदवीसाठीच्या संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
सदर विषयांचे संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील संशोधन करू इच्छिणाऱ्या होतकरू, हुशार व संशोधन उत्सुक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना या निमित्ताने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून त्याचा लाभ कोपरगाव, येवला, राहता, लासलगाव, वैजापूर इ. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य यांनी केले.
चालू शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावरील पीएचडी संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जाणार असून त्या संदर्भात भूगोल विभाग प्रमुख डॉ. चव्हाण जी.के. रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ. काळे एस.बी. व प्राणीशास्र विषयाचे प्रा. डॉ. शिंदे एन.जी. यांच्याशी संपर्क साधावा.
संशोधन केंद्रासाठी मान्यता मिळाल्याने कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी व संदीप रोहमारे यांनी याप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांचे अभिनंदन केले.