गुरकुल शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी

ऑनलाईन शिक्षणाच्या आधुनिक वाटा वेबीनारमधून आत्मा मलिक शैक्षणिक संकुल गुरूकुल पद्धतीचा राज्याला परीचय

आत्मा मलिक ध्यानपीठाच्या माध्यमातून अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या कोकमठाण येथे शैक्षणिक क्षेत्रात 1995 साली आश्वासक पाऊल टाकत अनादी काळापासून चालत आलेली गुरूकुल शिक्षण पद्धतीस सुरवात केली. या पुरातन शिक्षण पद्धतीला आधुनिक साहित्याच्या मदतीने ध्यानातून संस्कार विद्यार्थ्यांवर होतात हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणेवर लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांतील Inborn learning ability (आत्माविष्कार) शोधून काढून मेंदुवर संस्कार करण्याची कपॅबिलीटी व कपॅसिटी वाढविण्याचे काम करण्यासाठी संस्थेमार्फत सिस्टीम तयार करून शिक्षण पद्धतीला नवा आयाम दिला. हे करत असताना विद्यार्थ्यांचा शाळेवेळेव्यतिरीक्त जास्तीचा वेळ व्यक्तिमत्वाचे पैलू घडविण्यासाठी मिळत असल्याने आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूकुल शैक्षणिक पद्धती सर्वोत्तम असल्याचे मत आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित राज्य स्तरीय “शिक्षणाच्या आधुनिक वाटा” या वेबीनारमध्ये ते बोलत होते.महाराष्ट्रातील दहा मानांकित संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा व सद्यस्थितीत शिक्षण पद्धती शिक्षणाच्या कोणत्या वाटा संस्थेने हाताळल्या याचा परीचय महाराष्ट्राला व्हावा म्हणून राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले होते.
संस्थेच्या शैक्षणिक कार्याविषयी बोलताना सुर्यवंशी पुढे म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांचे ब्रेन मॅपींग करून लर्निंग अॅबिलीटी नुसार विभागणी करून त्या त्या अविकसित क्षमता विकसित करण्याकडे शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गट करून लक्ष केंद्रित केले जाते.त्यामुळे निम्न क्षमता असणा-या विद्यार्थ्यांत उच्च क्षमता विकसनासाठी ध्यानाचा उपयोग झाला. शाळेत 28 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, एन.डी.ए.अकॅडमी, 62 प्रकारच्या खेळांची महाराष्ट्रातील भव्य क्रीडा अकादमी तसेच शैक्षणिक गुणवत्तेतील कामगिरी बाबतचा आलेख महाराष्ट्राला सुपरिचित करून दिला.
राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षणाच्या आधुनिक वाटा या वेबीनार आयोजना पाठीमागील माहितीच्या देवाण घेवाणीचा व संस्थाच्या कार्याचा परीचय इतरांना होऊन शिक्षक व छोट्या-मोठ्या संस्थांनी आदर्श घ्यावा या बाबतचा उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट केला. अशा अनोख्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजन केलेबाबत अमरावतीचे शिवदत्त ढवळे यांनी क्रीडा शिक्षक महासंघाचे आभार मानले. गणेश म्हस्के यांनी कार्याचा परीचय करून दिला तर बाळासाहेब कोतकर यांनी आभार मानले. प्रशांत खीलारी व संतोष खैरनार यांनी तांत्रिक सहकार्य केले. या वेबीनारसाठी झूम व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page