कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी
गौतम पॉलीटेक्निकचा १००% निकाल, परंपरा कायम
वृत्तवेध ऑनलाईन 16 जुलै 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इंस्टीट्युटच्या विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रथम वर्षे निकाल १००% असून प्रथम क्रमांक कु.वैष्णवी राजेंद्र गाडे ९३.७५ %, द्वितीय क्रमांक चि. दर्शन अनिल बनकर ९२.५३ %, तृतीय क्रमांक धनश्री नितीन भुसारे ९२.२५ % गुण मिळवून आली असल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
शाखेचे टॉपर
मेकॅनिकल द्वितीय वर्ष संतोष रामदास हराळे हा ९३.७५% गुण मिळवुन प्रथम, कॅम्पुटर द्वितीय वर्ष कु. थेटे आकांक्षा जयराम ९३.६०% गुण प्रथम, इलेक्ट्रिकल द्वितीय वर्ष कु.गवांदे कामिनी सोमनाथ ९२.८०% गुण मिळवून प्रथम आली आहे.
मॅकेनिकल द्वितीय वर्षे निकाल १००%
प्रथम क्रमांक संतोष रामदास हराळे ९३. ७५%, द्वितीय कु. शिंदे कावेरी संजय ८६.७५ %, तृतीय क्रमांक, चि.सुरज कैलास शिलेदार ८५.५० %,
द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल – निकाल १००%
प्रथम क्रमांक कु. गवांदे कामिनी सोमनाथ ९२.८०%, द्वितीय क्रमांक कु.निकिता बाबासाहेब डोळे ९२.५३ %, तृतीय क्रमांक चि.नवले वैभव पुंजाहारी ९१.५७ %,
द्वितीय वर्ष कॉम्प्युटर -निकाल १००%
प्रथम क्रमांक कु.आकांश जयराम थेटे ९३.६०%, द्वितीय क्रमांक कु. वृशाली बाळासाहेब रांधव ८९.३३%, तृतीय क्रमांक कु. निशा उत्तम ठाकरे
८९.०७ %,
द्वितीय वर्ष सिव्हील निकाल १००%
प्रथम क्रमांक कु. आकांशा सुनील रुकारी ९०.५० %, द्वितीय क्रमांक चि.भारत रामनाथ साळवे ८८.८८ %, तृतीय क्रमांक शामकांत रमेश गायकवाड ८७.७५ % गुण मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. अशोक काळे, संस्थेचे विश्वस्त,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ. चैताली काळे, सहसचिव सौ. स्नेहलता शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य सुभाष भारती सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





