राजकारणापलीकडे व पक्षविरहित नाती त्यांनी जपली -रावसाहेब खेवरे
Beyond politics and non-partisan relations, he maintained – Raosaheb Khevre
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sun 20 Mar 2022 14:10Pm.
कोपरगाव : शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी येसगाव येथील कोल्हे वस्ती येथे जाऊन कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन केले. राजकारणापलीकडे व पक्षविरहित नाती त्यांनी जपली असे म्हणून आठवणींना उजाळा दिला.
यावेळी त्यांनी सिंधुताई कोल्हे, दत्तू नाना कोल्हे नितीन बिपिन डॉ. मिलिंद, सौ स्नेहलता कोल्हे, अमित, सुमित, विवेक व ईशान कोल्हे यांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी त्यांनी आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा शंकरराव कोल्हे यांनी ज्या ज्या वेळेस भेट झाली त्या त्या वेळेस आपुलकीने चौकशी केली.
यावेळेस खेवरे नाना यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव प्रमोद लबडे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना नगरसेवक अतुल काले, माजी शहर प्रमुख भरत मोरे, सनी वाघ, बालाजी गोरडे, नितीश बोरुडे, आशिष निकुंभ, सागर जाधव, पप्पू पडियार, रंजन जाधव आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.





