सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोपरगाव शिवसेनेची मागणी

सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोपरगाव शिवसेनेची मागणी

File treason case against Somaiya, demand of Kopargaon Shiv Sena

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन!
Fir 8 Mar 2022,14 :00Pm.

कोपरगाव : भारतीय नौसेनेचे ‘आयएनएस विक्रांत’च्या नावावर गोळा केलेले कोट्यवधी रुपये हडप करून देशाशी गद्दारी करणारे भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांना त्वरित अटक करून तुरुंगात टाका, या मागणीसाठी आज कोपरगाव शिवसेनेच्या वतीने ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन देण्यात आले .

पोलिसांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून सोमय्या यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी प्रतारणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी कोपरगांव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लभडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना नेते बाळासाहेब जाधव, संपर्क प्रमुख प्रविण शिंदे, कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात, सचिव अशोक कानडे, राहुल होन, बाबासाहेब बढे, बाळासाहेब राऊत, साहेबराव कंक्राळे, संजय दंडवते, शंकरराव काळे, पुंडलिक कदम, सचिनराव आसणे, चंदुनाना भिंगारे, कृष्णा आहिरे, कृष्णा भिंगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page