एक हजार कोटीच्या विकास आराखड्याला अजित पवारांची जाहीर संमती
Ajit Pawar’s public consent to the Rs 1,000 crore development plan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 7 Mar 2022,20 :00Pm.
कोपरगाव: कोपरगाव मतदार संघातील आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध विकास कामांसाठी ना. आशुतोष काळे यांनी मांडलेल्या एक हजार कोटीच्या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत संमती दिली असल्याचा दावा ना. काळे यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आला आहे.
व्यापारी संकुल बांधणे, बसस्थानक व्यापारी संकुल उभारणे, भूमिगत गटारी, एकात्मिक रस्ते विकास,आवास योजने अंतर्गत नागरिकांना सदनिका, तीर्थक्षेत्र विकास, तसेच ग्रामीण भागातील ४० गावासाठी व्यायाम शाळा साहित्य, प्रत्येक गावांत स्मशानभूमी, पाणी योजना व वीज व्यवस्था,मंजूर बंधाऱ्याचे नुतनीकरण, सबजेल व मुलांचे व मुलींचे वस्तीगृह, आदिवासी भवन, माजी सैनिक भवन उभारणे, म्हाडा योजने अंतर्गत ६०० घरे शहरात उभारणे, कोपरगांव शहरातील नदी संवर्धन योजने अंतर्गत घाट सुशोभीकरण, नवीन सब स्टेशनची निर्मिती करून रोहीत्रांची क्षमता वाढविणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे आदी महत्वाची विकासकामे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने एक हजार कोटीचा कोपरगाव शहर व ग्रामीण भागाचा नियोजित आराखडा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्यापुढे मांडला.
मागील अडीच वर्षात ना. आशुतोष काळेंनी कोरोनाच्या संकटात प्रतिकूल परिस्थितीत देखील मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होवून उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देवून दिलेला शब्द पाळतो अशा शब्दात ना. आशुतोष काळेंच्या एक हजार कोटीच्या विकास कामांच्या आराखड्याला जाहीरपणे संमती दिली त्यामुळे विकासापासून दूर गेलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणण्यात ना.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.असे पत्रकात नमूद केले आहे .