केंद्र सरकारकडून इथेनॉल कर्ज वितरणास मुदतवाढ स्वागतार्ह- स्नेहलता कोल्हे
Extension of Ethanol loan from Central Government is welcome – Snehalta Kolhe
Rajendara Salkar l वृत्तवेधऑनलाईन ! Fir 8 Mar 2022, 14 :30Pm.
कोपरगाव: केंद्र सरकारने योजनांच्या प्रवर्तकांना आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि व्याज सवलतीचा लाभ उचलण्याची सुविधा देण्यासाठी २०१८-२१ या कालावधीत अधिसूचित केलेल्या सर्व योजनांच्या कर्ज वितरणाची मुदत ६ एप्रिल रोजीचे राजपत्रान्वये सदर स्किमची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. ती स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप एस.पुरी व केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या आयातीवरील अवलंबीत्व कमी करण्याचे दृष्टीने केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचं लक्ष ठेवले आहे. तसेच या योजनेअंतर्गत किमान ६% किंवा व्याज दराच्या ५०% यातील जी कमी रक्कम असेल ती रक्कम केंद्र सरकार व्याज अनुदानाच्या स्वरूपात सदर प्रकल्पाला देणार असून केंद्र शासनाचा हा निर्णय समाधानकारक व धाडसी असल्याचे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केले. विवेक कोल्हे म्हणाले की, केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे लवकरच ग्रामीण भागात इथेनॉल पंपांची उभारणी होणार असून नवीन वाहनांना मल्टीफ्युएल फ्लेक्स इंजिन किट बाजारात उपलब्ध होताच ऑईल कंपन्यांशी चर्चा करून अशा प्रकारचे इथेनॉल पंप लवकरच उभे राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.